सर्वच कठीण आहे…
प्रतिगामी शक्तींनी
हैदोस मांडलाय….
रान पेटवलंय…
हिरवळही पेटलीय
अजून काय जळेल
सांगता येणार नाही.
“माझं ते माझंच
तुझंही माझंच…
सर्वकाही माझंच…
मी एवढं सहजासहजी तुम्हाला
एक होऊ देणार नाही
स्वत:च्या पायावर
उभं राहू देणार नाही…
मला तुम्ही हवे आहात…पण…
फुल्यांच्या आधीचे…!
अगदी हुबेहुब तसेच…!”
“मी, होय मी…!
थोडा सावरलोय…
दोन जिने चढून
पलीकडचं पाहू लागलोय.
जिना कुणी लावलाय?
केव्हा लावलाय?
कशापासून बनवलाय?
मला काय करायचंय…!
वर चढून मला दिसतोय फक्त मी
आणि माझी हजारो वर्षांची
परमपवित्र, महान संस्कृती, परंपरा !
माझ्या गुरुंचा (बुवा-बाबांचा)
माझ्या डोक्यावर हात आहे…
(जो सध्या तुरूंगात आहे)”
म्हणून म्हणतो,
कठीण आहे…
खरंच कठीण आहे…
(१३/०९/२०१६)
© डॉ. राहूल पाटील