Dr. Rahul Rajani

अफू

लोकांना देवा-धर्माची एवढी अफू चारली गेलेली आहे आणि अलिकडे तिचे प्रमाण एवढे वाढविले जात आहे की, देवा-धर्माशिवाय आपलं काही खरं नाही, आपल्या आयुष्यातील संकटांवर आपण मात करू

शकत नाहीत, ती टाळू शकत नाहीत, नोकरी लागू शकत नाही, लग्न होऊ शकत नाही, लग्न झालं तर नवस केल्याशिवाय मुलबाळ (त्यातल्या त्यात मुलगा) होऊ शकत नाही, परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही (हरवलेला पासवर्ड सापडू शकत नाही) अशी त्यांची ठाम (मुर्ख) समजूत होऊन बसली आहे. ही गुलामगिरीची अवस्था आहे, हे अनेकांच्या गावीही नाही. देवा-धर्माची चिकित्सा करून काही निरीक्षणे नोंदविली की (या अफुच्या नशेमुळे) यांच्या मस्तकाची नस तडकते, तळपायाची आग मस्तकाला भिडते आणि असा व्यक्ती त्यांना राक्षसासारखा (आता पुराणातील राक्षस म्हणजे आपलेच पूर्वज हे यांना कसे ठाऊक असेल!) वाटू लागतो.
-राहूल पाटील

Exit mobile version