ज्ञानाधिष्ठित समाजाची वाटचाल

शांतपणे वाचा।
समजून घ्या।
पटल्यास शेयर करा।

★ वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत हे सर्व संस्कृत भाषेत आहेत.

★ परंपरेने भारतातील बहुजनांना वाचन- लेखनाचा अर्थात शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.

★ त्यात संस्कृत भाषा ही पुन्हा ‘देववाणी’. म्हणजे

देवांची भाषा. म्हणून ती बोलण्याचा, अभ्यासण्याचा तर प्रश्नच नव्हता.

★ म्हणून या ग्रंथांमध्ये ‘नेमके’ काय लिहिलेले आहे, हे आपल्याला माहीत नव्हते.

★ आज आपण तेच खरे मानतो, जे मध्ययुगीन कालखंडातील तुलसीदास, रामदास, मोरोपंत व इतर पंडित कवींनी लिहून ठेवलेले आहे किंवा अलीकडच्या काळातील कीर्तनकार, प्रवचनकार, बाबा, आध्यात्मिक-धार्मिक गुरू यांनी आपल्यावर बिंबवलेले आहे.

★ रामानंद सागर यांचे रामायण, महाभारत व इतर धार्मिक मालिकांनी तर लोकांच्या मेंदूचा पूर्णतः भुसा करून टाकलेला आहे.

★ जनमानसावर एकदा जे बिंबवले गेलेले असते, ते पुसून काढणे खूप म्हणजे खूप कठीण असते.

★ खरं तर ते पुसून काढण्याची गरजही भासली नसती, पण त्याचा गैरफायदा घेऊन उच्चवर्णीय या समाजावर आपले सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते त्यात यशस्वीही होतात.

★ त्यातून बहुजनांच्या गुलामगिरीची व शोषणाची व्यवस्था निर्माण होते.

★ भारतात ही गुलामगिरीची व शोषणाची परंपरा अडीच-तीन हजार वर्षांपासूनही आहे.

★ विशेष म्हणजे अशा पद्धतीने लहानपणापासून पिढ्यानपिढ्या ब्रेन वॉशिंग केल्या गेल्यामुळे गुलामांना आपण गुलाम आहोत व आपले शोषण केले जात आहे, याची पुसटशीही जाणीव होत नाही.

★ जो ही व्यवस्था लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतो, तो धर्मद्रोही व अलीकडे देशद्रोही समजला जातो.

★ इंग्रजांच्या आगमनानंतर/ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर/ राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर क्रमाक्रमाने शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांना मिळाला, त्याचा प्रचार-प्रसार ग्रामीण-आदिवासी भागात तळागाळातील लोकांपर्यंत झाला.

★ यातून शिक्षण घेणाऱ्यांच्या/ संशोधन/ चिकित्सा करणाऱ्या अभ्यासकांच्या पिढ्या निर्माण होऊ लागल्या.

★ महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामासामी, शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, नरहर कुरुंदकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. वि. भि. कोलते, हरी नरके अशा अनेक अभ्यासकांनी विविध अंगांनी वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत यांचा सखोल अभ्यास केला व आतापर्यंत समोर न आलेली तथ्ये उलगडून दाखवली.

★ पण आपल्याकडे पोटार्थी शिक्षण घेणाऱ्यांचे, बौद्धिक कष्ट न घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने यांचे प्रचंड अभ्यास करून लिहिले गेलेले ग्रंथ वाचले गेले नाहीत.

★त्यामुळे सत्य समाजासमोर येत नाहीये. ते जाणून घेण्याची कुणाची इच्छा व मानसिकताही नाहीये.

★ जे थोडेफार वाचण्याचा प्रयत्न करतात, ते बिचकून जातात. कारण जन्मापासून जे बिंबवलेले असते, त्याच्या विपरीत बऱ्याचदा सत्य असते.

★ सत्याला सामोरे जाणे व ते स्वीकारणे हे सोपे नसते. ते सर्वांना जमत नाही.

★ सत्याला शांतपणे सामोरे जाणे व ते स्वीकारणे हे धाडसाचे काम असते. ते सर्वांच्या हिताचे असते.

★ थोडक्यात जो पर्यंत शिकणे, ज्ञान संपादन करण्याचा अधिकार नव्हता, तोपर्यंत काही माहीत नव्हते, हे समजू शकते. पण आता ते शक्य असूनही बौद्धिक आळसामुळे आपण त्यापासून वंचित राहणार असू तर आपला खऱ्या अर्थाने उद्धार कुणीही करू शकत नाही.

★ आपला समाज हा कधीही ‘ज्ञानाधिष्ठित समाज’ म्हणून विकसित होऊ शकत नाही.

★ आपण कधीही मुक्त, शांततामय सहजीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत.

असो! 🙏🙏

© राहुल

(पटल्यास शेयर करा.)

One thought to “ज्ञानाधिष्ठित समाजाची वाटचाल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *