Dr. Rahul Rajani

जात व धर्माचे कोष, त्याचे परिणाम

भारतीय समाजात प्रत्येक ‘जात’ हा एक कोष आहे व असे असंख्य कोष ‘धर्म’ या कोषात समाविष्ट आहेत.

काही जण थोड्या फार प्रमाणात पहिल्या कोषातून बाहेर पडले की दुसऱ्या मोठ्या कोषात अडकतात. परंतु या

दोन्ही कोषांमधून चांगले शिकले-सवरलेले, स्वतःला उच्चभ्रू समजणारे, विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहणारे व दाखविणारेही बाहेर पडलेले नाहीत.

या कोषात अडकून इथल्या समाजाचे जे अपरिमित नुकसान झालेले आहे, त्याची कल्पनाही करवत नाही.

जोपर्यंत या कोषांमधून आपण बाहेर पडत नाहीत तोपर्यंत निखळ माणूस बनण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही, हे वास्तव आहे.

Exit mobile version