मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी – मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण,
शोषण, कट्टरता, अज्ञान, गल्लेभरूपणा इ. गोष्टींना कडाडून विरोध करतो. आपण महाराष्ट्रातील संत तुकाराम, सावरकर, प्रबोधनकार, फुले, लोकहितवादी, आगरकर, ताराबाई शिंदे, इ. चे वैचारिक साहित्य वाचले तर माझ्या उद्देशाबद्दल शंका घेणार नाहीत व माझ्यावर असले बिनबुडाचे आरोपही करणार नाहीत.
२१ व्या शतकातही धर्माच्या नावाने चालवलेल्या बावळट गोष्टी, अज्ञानमुलक कर्मकांडे, विधी, वेळ-पैसा-श्रम-बुद्धी यांचा दुरुपयोग, धर्माचा राजकारणासाठी-सत्तेसाठी वापर इ. मुळेच ‘धर्म’ या खूप चांगल्या व विधायक संकल्पनेचे, त्यातील तत्त्व व सदाचार, सत्य, नीती, प्रेम, दया-करुणा, बंधुता इ. मानवी मुल्ल्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
(सर्व धर्मांना लागू…)
© डॉ. राहुल