लोकशाही

लोकशाही व्यवस्थेत तात्त्विकदृष्ट्या सर्वजण समान असतात. व्यावहारिकदृष्ट्या मात्र खूप विषमता व भेदाभेद असतो. ही विषमता व भेदाभेद जसजसा कमी होत जाईल, तसतशी लोकशाही सुदृढ व सामान्यांसाठी फायदेशीर ठरत जाईल. परंतु त्यासाठी सामान्य लोकांनी लोकशाही

टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. ही विषमता, भेदाभेद याची कारणे कोणती आहेत, ती जाणून घेऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या मते, भारतासारख्या देशात या विषमतेची कारणे ही जात, धर्म, वंश, लिंगभेद इ. आहेत. या गोष्टी कमी व्हायला हव्यात. या गोष्टी आपण आपल्या उंबरठ्याच्या आत ठेवून सार्वजनिक जीवनात धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष व फक्त माणूस म्हणून वावरायला हवे. विभूतीपूजा ही सुद्धा सुदृढ व चांगल्या लोकशाहीसाठी प्रचंड घातक गोष्ट आहे, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. त्यासाठी राज्यघटनेप्रती लोकांमध्ये जागृतता निर्माण व्हायला हवी. राज्यघटनेबद्दलची माहिती, ज्ञान व आदर वाढायला हवा. कारण तात्विक पातळीवरची समानता व ती निर्माण होण्यासाठीची व्यवस्था राज्यघटनेनेच निर्माण केलेली आहे. तिचा आग्रह प्रत्येकाने धरायला हवा.

– डॉ. राहुल रजनी

3 thoughts to “लोकशाही”

  1. बरोबर आहे हे, समाजात बदल होने खुप गरजेचे आहे.

  2. बोलणे, वागणे आणि लिहिणे या तिन्ही क्रिया आज मानवाच्या भिन्न असताना दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *