कधी कधी कुणास ठाऊक
एकटं राहावसं वाटतं
गर्दीतून बाहेर पडून
पाय नेतील तिकडे
निघून जावसं वाटतं
अनोळखी रस्ता तुडवावा
एकट्याने…एकट्याने…
अनंताचा शोध घ्यावा
एकट्याने…एकट्याने…
अनंत म्हणजे काय?
मला ठाऊक आहे
काहीच नाही,
कुणीच नाही
म्हणून कुणीच भेटू नये
या वाटेवर
कुणीच दिसू नये
या वाटेवर
विचारचक्र थांबावे
मन स्थिर-स्थिर व्हावे
स्वतःलाही विसरावे
सर्वकाही विसरावे
जगलेले… भोगलेले…
…
…
…
फक्त चालत राहावे
चालत रहावे…
चालत रहावे …
पण कुठपर्यंत ? कधीपर्यंत ?
आणि चालायचे तरी का?
थांबून का नाही जायचं
कायमचं…! अगदी कायमचं…!!
(०९/०३/२०१६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113