केंद्राच्या १५℅ कोट्यातील मेडिकलच्या एकूण जागांमधील ओबीसींसाठी असलेले २७% आरक्षण बंद करून टाकले गेलेले आहे. त्यामुळे यापुढे दरवर्षी जवळपास ३००० पेक्षा जास्त OBC च्या जागा कायमस्वरूपी संपून गेलेल्या आहेत.
गेल्या २ वर्षात OBC च्या मेडिकलमधील ५५०० पेक्षा जास्त जागा OBC ना न देता त्या general
कोट्यामधून भरल्या गेल्यात. लिंक- https://maharashtratimes.com/career/career-news/27-precent-obc-reservation-in-medical-and-dental-college-pil-in-delhi-high-court/amp_articleshow/76426474.cms म्हणजे ओबीसींचे गेल्या २ वर्षात तेवढ्या जागांचे नुकसान झालेले आहे व आता OBC चे दरवर्षी तेवढे कमी MBBS व इतर डॉक्टर बनतील. सरकारी महाविद्यालये व खाजगी महाविद्यालयांमधील फी व डोनेशन यात प्रचंड फरक असतो. माझा सख्खा मावसभाऊ जे. जे. सरकारी महाविद्यालय, मुंबई येथे शिक्षण घेत आहे. त्याला दरवर्षी जेमतेम २०-२५ हजार रुपये खर्च येत आहे. त्यापैकी बरेचसे शिष्यवृत्तीमधून परत मिळून जातात. तर खासगी महाविद्यालयांमध्ये काही लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत फी व डोनेशन मिळून घेतले जातात. अशा परिस्थितीत सर्वसामान्य ओबीसी वैद्यकीय शिक्षण कसे घेऊ शकणार?
एकीकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सवर्णांना केंद्र सरकारने एकूणच सर्वच क्षेत्रांमध्ये १०% आरक्षण दिलेले आहे व दुसऱ्या बाजूला पिढ्यानपिढ्या अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, सामाजिक, राजकीय मागासलेपणा यात खितपत पडलेल्या ओबीसी वर्गाला आरक्षण मिळून जेमतेम ३० वर्ष होत नाहीत, तेवढ्यात ते टप्प्याटप्प्याने संपविण्याचा घाट घातला जात आहे, ह्याचा अर्थ समजून घ्यावा व पुढील विचार करावा.
आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया कापला जात आहे व उच्च शिक्षणातील संधी जाणीवपूर्वक संपवल्या जात आहेत. फुलेपूर्व काळाकडे आपली छान जोरात वाटचाल सुरू आहे व याला सर्वसामान्यांचे तसेच कित्येक उच्चशिक्षित, नोकरदार यांचे (जागरुकतेच्या अभावामुळे) छान समर्थन मिळत आहे, असंच चालू ठेवा, आपले भविष्य उज्ज्वल आहे!
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113