उंची


विद्यापीठाच्या इमारती
पहा पहा उंच किती !
एकही उंच मनुष्य मात्र


मला भेटला नाही


लोकांची उंची मोजताना
मला सवाल पडला
‘माझा खुजेपणा का
अजून नाही सरला?’
(१३/०९/२००९)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *