बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी
थोडे वाचनाचे कष्ट घ्यायला आपण तयार नसतो. त्यामुळे त्यांनी कशा प्रकारच्या समाजाचे स्वप्न पाहिले होते, हे आपल्या गावीही नसते. म्हणून महापुरुषांच्या बलिदानामुळे सुख भोगणारे आपण आयुष्यभर त्यांच्या विचारांविरुद्ध वागत असतो.
तर याउलट ज्यांनी आयुष्यभर मुस्लीमद्वेष पेरला, समाजात दुही, दंगे निर्माण केले ते मात्र आपल्याला हिरो वाटतात. आपण त्यांच्यावरील चित्रपट, व्हिडीओ बघतो. ते फॉरवर्ड करतो. त्यांचे स्टेट्स ठेवतो.
म्हणून म्हणतो, आपल्याइतकी कृतघ्न व निर्बुद्ध जमात या जगात शोधून सापडणार नाही. आपल्यासाठी झटणाऱ्यांना उपेक्षेने कसे मारायचे, त्यांचे विचार/ कार्य यांचा भोस* कसा करायचा या कलेत आपल्याइतके कुशल लोकं जगात कुठेही बघायला मिळणार नाहीत. यात शिक्षित-अशिक्षित-उच्चशिक्षित-अर्धशिक्षित सर्वच जण आघाडीवर आहेत.
(१९/०२/२०१४ रोजी 'शिवजयंती'निमित्त मी छत्रपती शिवाजी शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था, जव्हार, जि. पालघर आयोजित कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानाची पूर्वतयारी करताना खालीलप्रमाणे लिहून ठेवले होते.) भारतात कोणत्याही कालखंडात राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या तीनही सत्ता मूठभर लोकांच्या हातात राहिल्या आहेत. हा विशिष्ट वर्ग वगळता इतर…
प्रिय बंधू-भगिनींनो, हिंदू धर्मातील शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, स्त्रिया अशा जवळपास ८५-९०% घटकांच्या गेल्या २००० वर्षातील आपल्या पूर्वजांना शिक्षणाचा, संपत्ती संचय करण्याचा, राज्य मिळवण्याचा अधिकार मुस्लिमांनी नाकारलेला नव्हता. तर इथल्या उच्चवर्णीयांनी मनुस्मृतीच्या आधारे त्यावर बंदी घातली होती. म्हणून आपल्या मागासलेपणाला मुस्लिम जबाबदार नसून येथील…
मित्रांनो, मी वर्गात अनेकदा विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो असतो की, तुम्ही किती वेळ अभ्यास करतात? विद्यार्थी बऱ्याचदा स्वतःहून काहीच उत्तर देत नाहीत. मग मी स्वतःहून विचारतो की, दररोज न चुकता दिवसातून ३ तास किती जण अभ्यास करतात? कोणीच हात वर करत नाही. मग मी २ तास, १ तास, अर्धा तास,…