तू, मी व आपण सर्व
एकाच रस्त्याने जाणार
गर्भातून सुरू झालेला हा प्रवास
सरणावर जाऊन संपणार ।।धृ.।।
देह नश्वर, नाती नश्वर,
नश्वर भाव-भावना,
पैसा नश्वर, संपत्ती नश्वर
नश्वर दुःख वेदना
तशीच नश्वर सुखे अपरंपार
अन् गर्भातून… ।।१।।
उगाचच मांडतो मग आपण
स्वार्थाचा बाजार
क्षणाचा नसतो भरवसा
स्वप्ने आपली हजार
स्वप्नातच आपली ही रात्र आहे संपणार
अन् गर्भातून… ।।२।।
लुटति इथे गरिबांना
मिळूनि सारे अमीर
छळति येथे दुबळ्यांना
बलवान भरपूर
अमिरही व बलवानही सारे नष्ट होणार
अन् गर्भातून… ।।३।।
(२००६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113
खूप मस्त कविता आहे सर