‘कोसला’ ही मराठीतील एक श्रेष्ठ दर्जाची कादंबरी. १९६३ साली भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ती लिहिली. ‘कोसला’चा समकालीन व नंतरच्या पिढीवर खूप मोठा प्रभाव पडला.
‘कोसला’ प्रत्यक्ष ऐकणे हा एक ग्रेट अनुभव आहे. मी एम. ए. करत असताना ‘कोसला’चे अभिवाचन आकाशवाणीवर प्रसारित होत होते. त्यावेळी मी मित्राचा छोटा रेडिओ मिळवून तो कॉलेजमध्ये न्यायचो. कारण कॉलेजची वेळ व ‘कोसला’च्या प्रसारणाची वेळ ही एकच
होती. त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे लेक्चर सुरू व्हायच्या आधी अभिवाचन संपलेले असायचे. ‘कोसला’ वाचलेली होतीच. ‘कोसला’च्या प्रेमात होतोच. प्रत्यक्ष ऐकल्यानंतर अविस्मरणीय असा अनुभव आला. असे कित्येक दिवस या अनुभूतीत गेले.
गेल्या बारा-तेरा वर्षांपासून मीही ऐकले नव्हते. चार-पाच वर्षांपासून मी युट्यूब वगैरेवर शोधत होतो. पण कुठे मिळाले नाही. परवा श्री. मितेश टाके नावाच्या एका मित्राने एकलिंक पाठवली आणि पाहतो तर काय! कोसलाच्या अभिवाचनाच्या सर्वाच्या सर्व भागांची ती लिंक होती. दोन दिवसांमध्ये २५ भागांपैकी ४-५ भाग ऐकून झाले. खरंच खूप आनंद झाला. तोच आनंदाचा ठेवा तुमच्यासाठी पाठवीत आहे.
ऐका आणि तुम्हीही ह्या समृद्ध करणार्या अनुभवाचे भागीदार व्हा.
http://HTTPS://anchor.FM/parivartan
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113