लोकशाहीपुढील आव्हाने

औरंगजेब याचे स्टेट्स ठेवणे चुकीचेच होते. पण असे केल्याने कुणाचाही अपमान होत नाही. मात्र इथे खालील घटना घडताना कुणाच्याही भावना दुखावल्या जात नाहीत, कुणाचाही अपमान होत नाही. उदा.

● गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळीबार

केला जातो.
● तो कपाळावर गोल कुंकू लावणारा कोणता तरी बाबा गांधीजींना जाहीर शिव्या देतो.
● साध्वी (?) प्रज्ञा सिंग नथ्या गोडसेला महात्मा म्हणते व शहीद हेमंत करकरे माझ्या शापाने मेले असे म्हणते.
● इथे जाहीररीत्या संविधान जाळले जाते.
● आडवाणी मोहम्मद अली जिनाचे कौतुक करतात.
● रामदास शिवाजी महाराजांचे गुरू नसताना अनेक बाबा बुवा जाहीरपणे सांगतात व तशा प्रतिमा लोकं घरात लावतात, दुकानांमध्ये विकल्या जातात.
● सावित्रीबाई फुले, म. फुले, शिवाजी महाराज यांचा अपमान राज्यपाल पदावरील व्यक्ती करतात व उपमुख्यमंत्री पदावरील नेते त्याचे समर्थन करतात.
● शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भगतसिंग यांच्या मूळ विचारांचे विकृतीकरण करून त्यांचे भगवेकरण केले जाते.
● संसदेच्या इमारतीच्या उद्घाटनाला काहीही संबंध नसताना बाबा बुवांना बोलावले जाते.
● जागतिक कुस्तीपटू महिलांचे लैंगिक शोषण होते व त्या गुन्हेगाराची तक्रार करायला गेल्यास त्यांना त्रास सहन करावा लागतो.
● पुलवामाची सखोल चौकशी होत नाही.
● कुरुलकर पाकिस्तानी महिलेच्या नादी लागून भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवतो.
● दलित मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार होतात.
(माझ्याकडून अनेक गोष्टी सुटल्या असतील. तुम्ही भर टाकू शकता.)

या व अशा घटना दररोज घडत असताना आपल्या भावना दुखावल्या जात नाहीत. पण कुणीतरी माथेफिरूने ४०० वर्षांपूर्वी झालेल्या कोणत्या तरी बादशहाचा फोटो ठेवला की आपला अपमान होतो.

इतका निर्लज्जपणा, नीचपणा, निर्बुद्धपणा, रिकामटेकडेपणा कुठून येतो कुणास ठाऊक!

  • डॉ. राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *