जो देवाधर्माच्या पलीकडे गेलेला असतो, तोच खऱ्या अर्थाने ‘आत्म’निर्भर असतो.
कारण तो
१) त्याच्या आयुष्यातील लहान-मोठ्या समस्या, प्रश्न,
संकटे, दुःख, अडचणी यांना सामोरे जाण्यासाठी,
२) नोकरी, मनासारखी बायको-नवरा, अपत्य मिळवण्यासाठी,
३) परीक्षांमध्ये, व्यवसायात, करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी,
४) शेतात चांगले पिकावे यासाठी
५) या व इतर असंख्य गोष्टींसाठी
कोणत्याही काल्पनिक शक्तीवर अवलंबून नसतो. त्या शक्तीला प्रसन्न करण्यासाठी-ठेवण्यासाठी तो कोणतेही नवस, उपास-तापास, रोजे, वाऱ्या, विधी, प्रार्थना, आरत्या, नमाज, यज्ञ यासारख्या कोणत्याही गोष्टी करत बसत नाही.
तो फक्त प्रयत्न करत राहतो. त्याचे काम पूर्ण क्षमतेने करत राहतो. त्या कामातील यशाच्या आड कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यांचा अभ्यास करतो, योग्य व्यक्तींशी चर्चा करतो व त्या पद्धतीने निर्णय घेत राहतो. अभ्यास, चर्चा, निर्णय घेणे, अंमलबजावणी करणे… अपयश आल्यास, ठरवलेल्या गोष्टी मिळवण्यात कमी पडल्यास पुन्हा अभ्यास, चर्चा करणे, अशी प्रक्रिया तो करत राहतो. कारण हाच जगण्याचा योग्य मार्ग आहे, हे त्याला चांगलेच माहित असते.
© राहुल