गणपती हे आताचे राष्ट्रपती, सभापती यांसारखेच एक पद होते. ती व्यक्ती नव्हती. राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख. सभापती म्हणजे सभेचा प्रमुख. त्याचप्रमाणे गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. समुहाचा, समुदायाचा प्रमुख.
‘गण’ म्हणजे लाेकं, समुह, समुदाय (अनेकनचनी रूप). शब्दकोशांमध्ये तपासून पहा, ‘गण’ या शब्दाचा हाच अर्थ दिलेला आहे. तर पती म्हणजे प्रमुख (नवरा नव्हे).
भारतात गणराज्य आहे. म्हणजे लोकांचे राज्य आहे. याचा अर्थ गण म्हणजे लोकं.
भारतात राज्यव्यवस्था निर्माण व्हायच्या आधी टोळ्या हाेत्या. या टोळ्यांच्या प्रमुखाला ‘गणपती’ असे म्हणत. या पदावर विराजमान होणारी व्यक्ती ही बलशाली व बुद्धिमान असायची. ही व्यक्ती त्या टोळीतील प्रथम नागरिक असायची. जसे आपल्या घरात काही कार्यक्रम असेल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तीला मान दिला जातो. कॉलेजमध्ये प्राचार्यांना, शाळेत मुख्याध्यापकांना, संस्थेत अध्यक्षांना तालुक्यात आमदाराला, राज्यात मुख्यमंत्र्यांना, केंद्रात प्रधानमंत्र्यांना व आपल्या देशात राष्ट्रपतींना प्रथम स्थान असते. तसेच त्या टोळीत काही कार्यक्रम असल्यास पहिला मान त्या व्यक्तीला मिळायचा. म्हणजे या गणपतीला मिळायचा. त्यामुळे आजही कोणत्याही धार्मिक कार्याची सुरुवात गणपतीच्या पुजनाने होते. त्याला प्रथम स्थान मिळते. ज्ञानेश्वरांनी त्याचे वर्णन ‘ओम नमाेजी आद्या’ असे केलेले आहे. आद्या म्हणजे आद्य, आद्य म्हणजे पहिला.
याचाच अर्थ गणपती हा देव नव्हता, तर राजा असायचा. या पदांवर आलेल्या व्यक्तींची नावे आज कुणालाच ठाऊक नाहीत. पण आजच्या राज्यव्यवस्थेच्या आधीचे ते एक महत्त्वाचे पद असल्याने त्याची स्मृती या पद्धतीने जतन केली जात आहे. आधी जगात सर्वत्र राजाला देव मानले जायचे. तसेच या गणपतीला देवत्व प्राप्त झालेले आहे.
या सर्व गोष्टींवरून अष्टविनायक या कल्पनेचीही मीमांसा करता येते. अष्टविनायक म्हणजे आठ ठिकाणचे गणपती. हे त्या त्या आठ ठिकाणचे गणपती त्या काळातील पराक्रमी राजे असावेत. (पण त्यांची नावे आज कुणालाही माहित नाहीत.) म्हणून आज त्यांना महत्त्व प्राप्त झालेले आहे.
(हिंदी मे अनुवाद ….
गणपति
गणपति वर्तमान राष्ट्रपति और सभापति के जैसा एक पद था. वह एक व्यक्ति नहीं था. राष्ट्रपति राष्ट्र का प्रमुख होता हैं. अध्यक्ष सभा का प्रमुख होता है. इसी तरह, गणपति गणों के प्रमुख, समुदाय के प्रमुख हुआ करते थे.
‘गण’ का अर्थ होता है लोग, समूह, समुदाय (बहुवचनी रूप), पति याने मुख्य (husband नहीं).
भारत एक गणतंत्र है. याने भारत में लोगों का राज्य है. इसका मतलब ‘गण’ का अर्थ लोग होता है.
भारत में राज्यप्रणाली के निर्माण से पहले, गिरोहों हुआ करते थे. इन गिरोहों के मुखिया को गणपति कहा जाता था. इस पद पर बैठा व्यक्ति शक्तिशाली और बुद्धिमान होता था. यह व्यक्ति उस जनजाति का पहला नागरिक होता था. उदाहरण के लिए, यदि आपके घर में कोई समारोह होती है, तो घर के वरिष्ठ व्यक्ति को पहेले सम्मानित किया जाता है. कॉलेज में प्रिंसिपल, स्कूल में हेडमास्टर, इंस्टीट्यूट में प्रेसिडेंट, राज्य में मुख्यमंत्री, केंद्र में प्रधानमंत्री और हमारे देश में राष्ट्रपति का प्रथम स्थान होता हैं. वैसे ही अगर गिरोह में कुछ समारोह होते थे, तो पहला सन्मान उस व्यक्ति को दिया जाता था. याने इस गणपति को दिया जाता था. इसलिए, आज कोई भी धार्मिक गतिविधि गणपति की पूजा के साथ शुरू होती है. उसे पहला स्थान मिलता है. संत ज्ञानेश्वर इसे ‘ओम नमाजी आद्या’ के रूप में वर्णित करते हैं. आद्या का अर्थ है आद्य, आद्य याने प्रथम.
इसका मतलब यह है कि, गणपति एक देवता नहीं बल्कि राजा होते थे. आज इन पदों पर स्थानापन्न रह चुके व्यक्तियों के नाम कोई नहीं जानता. चूंकि यह आज की राज्यप्रणाली से पहले एक महत्वपूर्ण पद था, इसलिए इसकी स्मृति को इस तरह से संरक्षित किया जा रहा है. सबको पता होगा कि, राजा को पूरे विश्व में एक देवता माना जाता था. वैसे ही इस गणपति को देवत्त्व प्राप्त हुआ है।
इसी तरह से अष्टविनायक कल्पना की मीमांसा की जा सकती है. अष्टविनायक याने महाराष्ट्रा के आठ स्थानों के गणपति. ये आठ स्थान के गणपति उस समय के शक्तिशाली राजा रह चुके होंगे. इसलिए, आज उनको महत्व प्राप्त हुआ है.)
© Copyright