घरभाडे करारपत्राचा नमुना

(मी माझ्या लग्नानंतर आतापर्यंत जव्हार, जळगाव व नाशिकला मिळून ९ भाड्याच्या घरांमध्ये राहिलो. त्यापैकी जव्हार व नाशिकला मी हा नमुना वापरला. जो मला माझ्या एका ज्येष्ठ सहकार्‍यांकडून मिळालेला होता. सरकारी करारनाम्यांमध्ये प्रमाण लेखनाच्या किती चुका असतात, हे आपणास ठाऊक आहे. यात मी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. हा नमुना सर्वांसाठी इथे देत आहे.)

 

लिव्ह अँड लायसेन्स करारनामा

(अकरा महिन्याच्या तत्वावर)

लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामा आज दि………………… रोजी, ………………… या दिवशी नाशिक मुक्कामी लिहून देतो की,

श्री. घर मालकाचे नाव,

वय वर्षे ………….., धंदा-………….,                                                                          लिहून घेणार

भाड्याने द्यायच्या घराचा पत्ता                                                                             (लायसेन्सॉर)

…………………………………………….

……………………………………………

यांसी

श्री. भाडेकरुचे नाव,

उ. व. 34, धंदा – नोकरी,                                                                            लिहून देणार

भाडेकरुचा पत्ता                                                                                        (लायसेन्सी)

……………………………………………..

…………………………………………….

 

कारणे लिव्ह अँड लायसेन्स करारनामा लिहून देतो ऐसा जे की:

1) मिळकतीचे वर्णन :

……………………………………………………………………………………………….... सदर मिळकतीमधील लाईट व नळ कनेक्शनसह.

 

2) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेली मिळकत ही तुमच्या नावे व मालकीची असून ती तुम्ही मला 11 महिन्यांसाठी राहण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स करारनाम्याने द्यावी, अशी मी तुम्हास विनंती केल्याने व माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मला सदर मिळकत खालील अटी व शर्तीवर देत आहात.

 

अटी व शर्ती:

अ) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा लिव्ह अँड लायसेन्सचा करारनामा दि. ……………. पासून पुढे अकरा महिने म्हणजे दि…………………….. पावेतो अंमलात राहील.

 

ब) सदर लिव्ह अँड लायसेन्स करारनाम्यान्वये सदर मिळकतीची लायसेन्स फी एकूण रु. 4500 (अक्षरी रुपये चार हजार पाचशे मात्र) सदरची लायसेन्स फी दरमहाचे 30 तारखेपर्यंत देण्याचे ठरले आहे. तसेच डिपॉझिट म्हणून रु. 20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार रुपये मात्र) लिहून देणार यांनी आज रोजी चेक स्वरूपात (चेक क्र. ………………………., दि. ……………….., बँक ऑफ महाराष्ट्र) दिलेले आहेत. सदर मिळकतीचे लाईट बिल व नळपट्टी लिहून देणार यांनी लायसेन्सी फीव्यतिरिक्त वेगळे भरावयाचे आहे, हे उभयतांना मान्य व कबूल आहे. सदरहू डिपॉझिटची रक्कम मिळकत निर्वेध व सुस्थितीत घरमालकाच्या ताब्यात दिल्यानंतर बिनव्याजी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना परत करावयाची आहे.

 

क) दि……………………. रोजी मुदत संपताच मी त्यात असलेले माझे सामान-सुमान काढून घेऊन लिहून घेणार यांना निर्वेध असा मिळकतीचा कब्जा देईल.

 

ड) लिव्ह अँड लायसेन्स करारनाम्याच्या 11 महिन्यांदरम्यान जर लिहून घेणार यांना मिळकत खाली करून पाहिजे असल्यास त्यांनी मला एक महिने पूर्व लेखी/ तोंडी सूचना कळवावयाचे आहे. तसेच मला जर मुदतीच्या आत सदर घर मिळकत सोडावयाची झाल्यास तसे मी त्यांना एक महिने आधी कळवावयाचे आहे. तसेच घर मिळकतीचा वापर हा लिहून देणार यांनी त्यांच्या स्वतःच्या केवळ निवासासाठी करावयाचा आहे.

 

इ) तसेच सदर कराराची मुदत संपताच सदर करारनामा संपुष्टात येईल आणि मी सदरची मिळकत तुमच्या ताब्यात देईल. सदरची मिळकत तुम्ही मला लिव्ह ऍन्ड लायसेन्स कराराने 11महिने मुदतीकरिता वापरण्यासाठी दिलेले असल्याने सदरच्या मिळकतीवर मला भाडेकरू म्हणून कोणतेही हक्क प्राप्त होणार नाही अगर मी सांगणार नाही.

 

ई) तसेच ह्या लिव्ह अँड लायसेन्स करारनाम्याने मुंबई रेन्ट्स कंट्रोल अॅक्टच्या नियमान्वये मी भाडेकरी व लिहून देणार हे घर मालक ठरत नाही. त्यांचे व माझे नाते लायसेन्सॉर व लायसेन्सी असेच आहे व राहिल.

 

उ) सदर लिव्ह अँड लायसेन्स करारनाम्याने मला कुठलाही हक्क पोहोचत नाही व सदर मिळकत आम्ही कुणालाही पोटभाड्याने देणार नाही. तसेच मिळकतीचा वापर हा निवासी कारणासाठी केला जाईल, त्यास लिहून देणार यांची पूर्ण संमती आहे. त्याबाबत लिहून देणार यांची काही एक तक्रार नाही. तसेच मिळकतीमध्ये स्फोटक द्रव्य वगैरे ठेवणार नाही तसेच मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करावयाचा नाही. सदर मिळकतीचा वापर कोणत्याही बेकायदेशीर व अनैतिक कामासाठी करावयाचा नाही, असे आम्ही मान्य व कबूल केलेले आहे.

 

ह) सदर मिळकतीमध्ये लिहून देणार यांना त्यांचे गॅस कनेक्शन सिलेंडर घेण्यास व बँकेतील अकाऊंटवरील पत्त्यात बदल करण्यासाठी ऍड्रेस प्रूफ (पत्त्याचा पुरावा) म्हणून वापरण्यास लिहून घेणार यांची संमती आहे, त्याबाबत लिहून घेणार यांची काही एक तक्रार नाही.

 

हा लीव्ह लायसन्स करारनामा राजीखुशीने, स्वसंतोषाने समजून-उमजून लिहून दिला आहे.

 

नाशिक

 

श्री. घरमालकाचे नाव                                                                           श्री. भाडेकरुचे नाव 

 

साक्षीदार :

 

1.————————————————————   2.————————————————————

3 thoughts to “घरभाडे करारपत्राचा नमुना”

  1. महोदय,
    स न वि वि
    आपण अतिशय उपयुक्त आणि सुंदर नमुना सामान्य

    जणांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
    धन्यवाद
    डॉ के डी पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *