मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना घराचे काम contractorकडून करून घ्यायचे असते. पण त्याच्याकडून काय लिहून घ्यावे, त्याचा नमुना आपल्याला माहित नसतो. माझ्या एका नातेवाईकाच्या घराचे काम सुरू होत आहे. त्याच्याकडे लिखित स्वरुपात हा नमुना मिळाला. तो सर्वांना उपलब्ध करून देत आहे. १०० रु.च्या stamp पेपरवर तुम्ही खालील करारनामा लिहून घेऊ शकता.
सूचना- १) यात तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार व प्रदेशानुसार बदल करू शकतात.
२) काही बांधकाम व्यवसायाशी संबंधित शब्द अशुद्ध असू शकतात. त्यात बदल करून घ्यावा.
बांधकामाचा करारनामा-
- बांधकामाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे-
- बांधकाम आरसीसी पद्धतीने करण्यात येईल. फुटींग खड्डे 4x4x4 असे असतील.
- पुढील सागवानी चौकट 7×3.5 फूट फ्रेमसह राहील व प्लायवूडचे शटर राहील. मधले दरवाजे सिमेंट चौकटीत प्लायवूडसह राहतील.
- पिलिंग बांधकाम बीमसहित 3.5 फूट इतके राहील.
- सेफ्टीटंक 5×10 एवढे राहील व त्याचे चार्जेस वेगळे राहतील.
- कॉलम खड्डे 4×4 एवढे राहतील.
- एक हॉल राहील व एक किचन राहील व समोरील बाजूस एक पोर्च राहील.
- एक बाथरूम व एक संडास कॉमन पद्धतीचा असेल.
- एक बेडरूम
- संडासातील दरवाजा वॉटरप्रूफ ॲल्युमिनियम सेक्शनमध्ये राहील.
- बाथरूमला संपूर्ण 7 फूट स्टाईल राहील (18×12) व संडासमधील टाईल्स तळसह 4 फूट राहील.
- किचन ओटा एल प्रकारानुसार ग्रीन मार्बलमध्ये राहील. 90 रुपये प्रमाणे ग्रेनाईट वापरण्यात येईल.
- नळ फिटिंग संडास आणि बाथरूममध्ये शॉवर. दोन नळ किचनमध्ये. दोन पॉईंट – एक नळाचा व एक टाकीचा असेल.
- प्रत्येक खिडकी थ्री ट्रॅकसह अल्युमिनियम सेक्शनमध्ये ग्रीलसह राहील.
- स्लॅब बांधणीमध्ये स्टील 10 mm व 8mmची रिंग वापरण्यात वापरण्यात येईल व बिम कॉलम 12mm, 10mm व 6mm ची रिंग वापरण्यात येईल.
- फुटींगसाठी 8mm व 10mm वापरण्यात येईल.
- खालील आऊटर बिमसाठी 12mm, 10mm व 6mm ची रिंग वापरण्यात येईल.
- स्लॅब वरती 3 फुट Parapet राहील व आतून बाहेरून पण प्लास्टरसह राहील.
- किचनमध्ये आवश्यकतेनुसार कडप्पा रॅक दिले जाईल.
- बांधकामासाठी वाळू ही तापीची वापरण्यात येईल व आवश्यकतेनुसार पांरा नदीची वापरण्यात येईल.
- लाईट फिटिंग व स्विच बोर्ड हे कन्सिल असतील व प्रत्येक रूममध्ये आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिक पॉईंट असतील व जनरल स्वरूपात राहतील.
- एसी पॉईंट व इन्व्हर्टर पॉईंटचे चार्जेस वेगळे लागतील. ते मालकाकडे राहतील.
- सर्व बांधकामासाठी व प्लास्टरकरिता आवश्यकतेनुसार सिमेंट प्रकार वापरण्यात येतील.
- संपूर्ण सिमेंटचे प्रकार 53 ग्रेडचे राहतील. बिर्ला ए 1, अल्ट्राटेक वंडर व आरसीसी कामासाठी अंबुजा सिमेंट वापरण्यात येईल.
- संपूर्ण कामाला स्टील हे पोलाद कंपनीचे वापरण्यात येईल.
- जिन्यातील टप्पे रायझर स्वरूपाचे टाईलसह असतील.
- Attached संडास बाथरूममध्ये कमोड हे आवश्यकतेनुसार ठेवण्यात येईल.
- रूममध्ये वॉल पुट्टी व प्रायमर आतून मारण्यात येईल.संपूर्ण घराला आतून व बाहेरून कलर मारायचा असला तर त्याचे पैसे मालकाकडून घेतले जातील.
- बांधकाम करण्याची पद्धत-
- ९ इंच बांधकामात ३५ पाटी वाळू आणि १ सिमेंटची गोणी.
- ६ इंच बांधकामात ३० टप वाळू आणि १ सिमेंटची गोणी.
- ४ इंच बांधकामात २५ टब वाळू आणि १ सिमेंटची गोणी.
- सिंगल कोट प्लास्टरला १८ पाटी वाळू आणि १ सिमेंटची गोणी.
- डबल कोट प्लास्टरला ७ पाटी वाळू आणि १ सिमेंटची गोणी असेल.
- जसे जसे काम पुढे होईल तसे तसे बांधकामानुसार पैसे दिले जातील.
- अटी व शर्तीनुसार बांधकाम न झाल्यास करारनामा रद्द समजण्यात येईल.
- सदर बांधकाम 867 स्क्वेअर फुट असून ते १२५० रुपये रेटनुसार दिलेले आहे.
- रूममध्ये पीसीसी व थंमस करण्यात येईल.
- समोरील दर्शनी भागावर फ्रंट साईट वेलवेशन केले जाईल.
- टीप
- जर ठरलेल्या करारातील साहित्यात काही वाढीव बदल झाल्यास त्यातील वाढीव रक्कम मालकाला द्यावी लागेल.
- लाईट, पाणी व वाचमन या गोष्टी मालकाकडे असतील.
- स्टील रेलिंग केल्यास त्याचे वेगळे चार्जेस लागतील.
- थ्री डी वेलवेशनचे वेगळे चार्जेस राहतील. आवश्यकतेनुसार मालकाकडून घेतले जातील. लेझर कटिंग मालकाकडे राहील.
- बांधकामाचे स्वरूप खालील प्रमाणे असेल-
- एक हॉल पीओपीसह असेल.
- एक पोर्च.
- एक किचन.
- एक संडास बाथरूम.
- एक बेडरूम.
- संपूर्ण कामाला वापरण्यात येणारे मटेरियलचे प्रकार-
- वीट, रेती, खडी, सिमेंट, स्टील इत्यादी स्वरूपाचे राहील.
- संडास बाथरूमला वापरण्यात येणारे टाईल्स ही 200 किंवा 220 रेटची असेल.
- हॉल, किचन व बेडरूमसाठी टाईल्स ही 2500/ 3000 या रेटची असेल.
- ग्रेनाईट 90 रु. स्क्वेअर फुटचे असेल. (किचनला व खिडकीला)
- लाईट फिटिंगसाठी आर आर पॉलीकॅप कंपनीची वायर वापरण्यात येईल.
- संपूर्ण प्लंबर कामाला सुप्रीम कंपनीचे मटेरियल वापरण्यात येईल.
- संपूर्ण कामाला पोलाद कंपनीचे स्टील वापरण्यात येईल.
- फुटींग जाडी 5 x 3.5 या स्वरूपाची जाळी असेल.
- कॉलम साईज 9 x 12 या स्वरूपाचे राहतील.
- कॉलम साईज 6 x 15 या स्वरूपाचे कॉलम राहतील.
- बीमची साईज 9 x 12 या स्वरूपाचे बीम राहतील.