कधी कधी कुणास ठाऊक
एकटं राहावसं वाटतं
गर्दीतून बाहेर पडून
पाय नेतील तिकडे
निघून जावसं वाटतं
अनोळखी रस्ता तुडवावा
एकट्याने… एकट्याने…
अनंताचा शोध घ्यावा
एकट्याने… एकट्याने…
अनंत म्हणजे काय?
मला ठाऊक आहे
काहीच नाही,
कुणीच नाही
म्हणून कुणीच भेटू नये
या वाटेवर
कुणीच दिसू नये
या वाटेवर
विचारचक्र थांबावे
मन स्थिर-स्थिर व्हावे
स्वतःलाही विसरावे
सर्वकाही विसरावे
जगलेले… भोगलेले…
…
…
…
फक्त चालत राहावे
चालत रहावे…
चालत रहावे …
पण कुठपर्यंत ? कधीपर्यंत ?
आणि चालायचे तरी का?
थांबून का नाही जायचं
कायमचं…! अगदी कायमचं…!!
(०९/०३/२०१६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
Related
आयुष्य सुंदर वाटतं जीवन जगल्यासारखं वाटतं चांगले मित्र असताना स्वर्गात असल्यासारखं वाटतं (२७/०९/२०१६) (मैत्रीदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!) © copyright डॉ. राहूल रजनी patilrahulb14@gmail.com Mob. No. 9623092113
August 2, 2020 In "चारोळी"
चंद्राचे आणि माझे नाते तसे खूप जुने आहे कधीकाळी भाकरीत चंद्र दिसायचा चंद्रात भाकरी शोधायचो ती मिळावी म्हणून ऊन-वारा-पावसाशी झुंजायचो नाही मिळाली तर हळूच टीपं गाळायचो चंद्राचे आणि माझे नाते तसे खूप जुने आहे कधी चंद्रात तिला पहिले कधी तिच्यात चांद पहिला तो मिळावा म्हणून तीळतीळ तुटलो…
March 5, 2020 In "Poem"
डाव अर्ध्यावर सोडून जात होतो पण खरंच सांगतो मी हरलो नव्हतो व कधी हरणारही नाही पण मी तरी काय करू डाव कधी रंगलाच नाही (मे २००६) © copyright डॉ. राहूल रजनी patilrahulb14@gmail.com Mob. No. 9623092113
February 27, 2020 In "Poem"