जात (कविता)
जात मारते काहींना
जात तारते काहींना
जात जवळ आणी
फक्त जातीतल्या माणसांना.
मने नासवते जात
रक्त पेटवते जात
जात संपवून टाकी
माणसाच्या माणुसकीला.
जात संपतही नाही
जात संपवत राही
जात सुरुंग लावी
समतादी मूल्यांना.
अशी कशी ही जात
हिने देश केला खाक
हिने लावलेली आग
कशी विझता विझेना.
(२५ ते ३० सप्टेंबर २०१६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113