महानुभाव पंथातील लोकांच्या मृत्यूनंतर दफनविधी केला जातो. माझ्या आजोबा व आजीचे याच वर्षी फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात मृत्यूनंतर त्यांच्या शेतात
दफन केले गेले. त्यामुळे लाकडे, तूप व इतर पदार्थ जाळून प्रदूषण झाले नाही. तसेच त्या अस्थी वगैरे घेऊन नद्या वगैरे शोधत फिरावे लागले नाही. याउलट त्या दफनाच्या जागेबद्दल आमच्या भावविश्वात एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आमच्या आजी-आजोबांचे अस्तित्व आम्हाला तिथे जाणवत राहते. आम्ही गावी गेलो की क्षणभर तिथे थांबतो. माझ्या मृत्यूनंतर माझेही माझ्या शेतात दफन केले जावे, हीच माझी इच्छा आहे. मात्र त्याप्रसंगी कोणतेही धार्मिक विधी करता कामा नयेत. तसेच ज्या ज्या अवयवांचे दान करणे शक्य आहे ते केले जावे अशी इच्छा आहे.
(मी महानुभाव पंथाचा नाहीये. पण पर्यावरणाचा विचार करता तसेच ज्या मातीत मी थोडाफार राबलो, जिच्यात आपले पूर्वज राबले तिच्यातच सामावून जावे असे वाटते.)
- राहुल रजनी