मी दुःखाची नाते जोडले
दोस्ती कायमची केली
व्याजाने घेतलेले आहे
ओठांवरचे हास्यही
दु:खाला पचवत नाही
कायमचे घेतले सोबतीला
हातात हात घालून आम्ही
पाहतो जीवननाट्याला
त्याची साथ चिरकाल
लोक येतील आणि जातील
त्याचा सहवास माझ्यासाठी
सुखाचा ठेवा असे
(०९/०३/२०१६)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113