देश हा फक्त भौगोलिक सीमांनी मिळून बनलेला नसतो. तर भौगोलिक प्रदेश व त्या भुप्रदेशातील माणसांनी मिळून देश तयार होत असतो. जसे घर हे फक्त भिंतींनी बनलेले नसते, तसेच देशाचे आहे.
म्हणून जे या देशाला (भुप्रदेशाला) आपलं मानत नाहीत, त्यांना देशद्रोहीच म्हणायला हवे.
परंतु माझ्यापुढचा प्रश्न आहे की, जे लोकं आपल्याच देशातील परधर्म व परजातीतील लोकांना आपले मानत नाहीत, त्यांना काय म्हणावे?
जर कुटुंबातील एखादी व्यक्ती घराला आपले मानत असेल, पण कुटुंबातील काही लोकांना आपले मानत नसेल, तर त्या व्यक्तीला आपण काय समजतो?
विचार करा व उत्तर द्या.