बहुजन समाजाचा निर्बुद्धपणा

          बहुजन समाजातील काही बधिरांना ज्यांनी आपल्याला हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करून सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली असे आपले महापुरुष फक्त तोंडी लावायला हवे असतात. या महापुरुषांचे विचार, कार्य समजून घेण्यासाठी

थोडे वाचनाचे कष्ट घ्यायला आपण तयार नसतो. त्यामुळे त्यांनी कशा प्रकारच्या समाजाचे स्वप्न पाहिले होते, हे आपल्या गावीही नसते. म्हणून महापुरुषांच्या बलिदानामुळे सुख भोगणारे आपण आयुष्यभर त्यांच्या विचारांविरुद्ध वागत असतो.

        तर याउलट ज्यांनी आयुष्यभर मुस्लीमद्वेष पेरला, समाजात दुही, दंगे निर्माण केले ते मात्र आपल्याला हिरो वाटतात. आपण त्यांच्यावरील चित्रपट, व्हिडीओ बघतो. ते फॉरवर्ड करतो. त्यांचे स्टेट्स ठेवतो.

         म्हणून म्हणतो, आपल्याइतकी कृतघ्न व निर्बुद्ध जमात या जगात शोधून सापडणार नाही. आपल्यासाठी झटणाऱ्यांना उपेक्षेने कसे मारायचे, त्यांचे विचार/ कार्य यांचा भोस* कसा करायचा या कलेत आपल्याइतके कुशल लोकं जगात कुठेही बघायला मिळणार नाहीत. यात शिक्षित-अशिक्षित-उच्चशिक्षित-अर्धशिक्षित सर्वच जण आघाडीवर आहेत.

 

  • डॉ. राहुल रजनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *