पुण्यातील दगडू शेठ हलवाईच्या गणपतीसमोरील दरवर्षी हजारो स्त्रियांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण, उच्चशिक्षित स्त्रियांची दररोजची कर्मकांडे, दैववाद, उपास-तापास, या सर्वांमधील बहुजनांचा
सहभाग हे सर्व बघून वैतागून काही उपाय योजना सुचवाव्याशा वाटतात. –
१) धर्मव्यवस्थेनुसार सर्वप्रथम स्त्रियांचा व सर्व ओबीसी, एस.सी., एस. टी. वर्गाचा शिक्षणाचा अधिकार बंद करावा/ काढून घ्यावा.
२) सहा महिने-वर्ष दोन वर्षांच्या मुलींच्या लग्नाची (बालविवाह) प्रथा, जरठकुमारी विवाह प्रथा पुन्हा सुरू करावी.
३) सतीप्रथा, केशवपन (विधवा झाल्यावर स्त्रियांची टकली करणे), विधवाविवाह बंदी, घटस्फोटाला बंदी इ. प्रथा पुन्हा सुरू कराव्यात.
४) वडील, पती यांच्या संपत्तीतील स्त्रियांचा अधिकार, संपत्ती धारण करण्याचा अधिकार काढून घ्यावा.
५) ओबीसी, एस.सी., एस. टी. आरक्षण १००% बंद करावे.
६) चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनरुज्जीवित करावी.
७) राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, म. फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मद्रोही व म्हणून देशद्रोही म्हणून घोषित करावे.
८) संविधान रद्द करून मनुस्मृतीचा कायदा पुन्हा सुरू करावा.
९) धर्मराष्ट्राची घोषणा करून टाकावी.
१०) हे सर्व हळूहळू न करता ताबडतोब करावे.
- डॉ. राहुल पाटील