माझ्या स्वत:साठी काही प्रश्न-
१) रावणाच्या बहिणीला लक्ष्मणाने नाक, कान
कापून विद्रूप केले, तिला आयुष्यातून उठवले. माझ्या बहिणीच्या बाबतीत असे घडले असते, तर मी काय केले असते?
२) सीतेसारखी विशी-पंचविशीतली अतिशय सुंदर तरुणी कित्येक वर्षे माझ्या कैदेत राहिली असती, तर मी तिच्याशी कसं वागलो असतो?
३) ज्यांनी रावणाच्या बहिणीला विद्रुप केले, त्याच्या मुलाला, भावंडांना युद्धात मारून टाकले, त्याचा युद्धात पराभव करून त्याला मृत्युसमीप आणून सोडले, असा लक्ष्मण रावणाकडे त्याच्या अंतिम क्षणी ज्ञानप्राप्तीसाठी गेला, त्याला रावणाने ज्ञान दिले. मी काय केले असते?
रावण महानच होता. तो युद्धात हरला, म्हणून महाकाव्यात खलनायक ठरला. तो जिंकला असता व राम-लक्ष्मण हरले असते, तर ते खलनायक ठरले असते. कारण साहित्यात जिंकणा-यांचेच गुणगाण गायले जायचे. निदान त्या काळात तरी.
चिकित्सा करा. पूर्वग्रह सोडा.
- डॉ. राहूल
सर प्रत्येकाचे सुप्त हेतु त्याला स्वार्थी बनवतात याला धर्म देखील अपवाद नाही