मनाला कसला
छंद हा आज
लागला आहे
रूप तुझे
डोळ्यांपुढून
क्षणभर न हलत आहे
अहाहा! हास्य तुझे
किती गोड!
मज भुलवत आहे
अहाहा! ओठ तुझे
किती नाजूक! कमळही
स्पर्श करू पाहे
गाल तुझे अहाहा!
मुरलेली दही
पांढरीशुभ्र आहे
केसांना तुझ्या
उडवताना, वाऱ्यालाही
मोद भरलाहे
वर्णाया रूप तुझे
शब्द बापुडे
बघ, लाजलाजताहे
फिरू नको अशी
भर बाजारी, हृदय
कित्येकांचे तूटताहे
मज चित्ता
मावेना हर्ष
गुण तुझे गाता हे!
२६/०५/२००७
(८.५०-९.२०)
© राहूल