विद्यार्थी मित्रांनो,
जी मुलं लेक्चरला येत नाहीयेत त्यांनी व इतरांनीही लक्षात ठेवा.
१) यावर्षी तुमची परीक्षा ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन होईल.
२) सर्व पेपर तुम्हाला लिहावे लागतील. ऑब्जेक्टिव्ह
काहीही असणार नाही.
३) प्रश्नपत्रिका मुंबई विद्यापीठाकडून येतील. तसेच पेपर तपासायला मुंबई विद्यापीठाकडेच जातील. तिथे तपासताना कोणत्या कॉलेजची मुलं आहेत, ते काहीच कळणार नाही.
४) अभ्यासक्रमात वाचून समजण्यासारखे विषय व घटक नाहीयेत. आम्ही दररोज लेक्चर घेऊन अतिशय बारकाईने सर्व समजावून सांगत आहोत.
५) या सर्व गोष्टी तुम्ही वर्गात बसून समजून घेतल्या तरच तुम्ही पास होऊ शकणार. अन्यथा तुम्ही नापास होणार.
६) तुमचे हे पदवीचे शेवटचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला पासदेखील काढता येणार नाही.
७) तुम्ही पेपर नं. ६ व ९ चा प्रकल्प जर लिहून दिला नाही तर तुम्ही नापास होणार.
७) दररोज लेक्चर, वाचन, नोट्स काढणे, आम्ही सुचविलेले काही व्हिडिओ बघणे या गोष्टी सातत्याने करणे तुमच्या फायद्याचे आहे.
८) बाकी आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे ते.
- डॉ. राहुल पाटील,
मराठी विभागप्रमुख
(११/०८/२०२२)