विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला शिकवणे, एखादा मुद्दा, घटक, संकल्पना समजत नसेल तर समजावून सांगणे, गृहपाठ देणे,
विविध उपक्रम राबवणे हे आमचे काम आहे. ते आम्ही सातत्यपूर्णरित्या करत असतो.
शिकवलेले समजून घेणे, गृहपाठ पूर्ण करणे, उपक्रमांमध्ये सहभागी होणे, काही समजले नसेल तर प्रश्न विचारणे, शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींवर मात करणे हे तुमचे काम आहे व ते तुम्ही दररोज करणे गरजेचे आहे आणि जर तुम्हाला सांगूनही तुम्ही काहीही करत नसणार तर त्याला आमचा नाईलाज आहे.
जे करतील, धडपडतील त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. नाही करणार त्यांच्याबद्दल आम्ही काहीही मत व्यक्त करू शकत नाहीत.
आपले, आपल्या कुटुंबाचे भविष्य कसे असावे या संदर्भात काहीएक विचार करून स्वतःच्या आयुष्याचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे.
डॉ. राहुल पाटील