विद्यार्थ्यांना उद्देशून..।

विद्यार्थी मित्रांनो, आम्ही प्राध्यापकांनी लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस वाया न घालवता अनेक वेबिनार अटेंड केले, अनेकांनी वेबिनार आयोजित केले. ७ किंवा १४ दिवसांचे online कोर्स केले, व्हिडिओ, PPT कसे बनवावेत, ते एडिट कसे करावेत, Google form वगैरेसारख्या कित्येक गोष्टी शिकून घेतल्या. Youtube, zoom वरून भरपूर ऐकलं, पुस्तकं वाचली, तुमच्यासाठी नोट्स तयार केल्या, अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तयार केले. Facebook live, zoom, google meet च्या माध्यमातून तुम्हाला, समाजाला संबोधित केले. Online अनेक उपक्रम राबविले.

अनेकांनी आपले पीएचडी, एमफिलचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेले. ज्यांनी आपले प्रबंध आधीच विद्यापीठाला सादर केले होते, त्यापैकी काहींनी ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा (Viva) देऊन पीएचडी पदवी संपादित केली.

Youtube वरून खूप सारे tutorial बघून अनेक कौशल्ये आत्मसात केली.


आम्ही जेव्हा-जेव्हा फोनवर बोललो तेव्हा जास्त तुमच्याविषयीच बोललो, तुमचीच काळजी आम्हाला वाटत राहिली. स्वतःचा हा विकास आम्ही फक्त तुमच्यासाठीच करत राहतो. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समाजाचा व देशाचा फायदाच होतो.

तुम्ही काय केले? आत्मपरीक्षण करा.

मित्रांनो, आयुष्यात पुढे जायचे असेल तर स्वस्थ बसून कसे चालणार बरं? तुम्हीच सांगा व तुम्हीच ठरवा.

आयुष्यात जिथून जे मिळेल, ते आत्मसात करत नवीन शिकत राहायला हवे. कालपेक्षा आज आपली थोडी का असेना समज, आकलन, बौद्धिक उंची वाढलेली असायला हवी. थांबून चालणारे कसे?

एक शिक्षक
(सर्व शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी वरील मत व्यक्त केले.)

6 thoughts to “विद्यार्थ्यांना उद्देशून..।”

  1. खूपच छान सर
    दुसऱ्याचे कॅरियर घडविण्यासाठी स्वतः शिकत राहाणे .वा सर धन्यवाद🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *