आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरा कुणीतरी आपल्याला कायमचा सुखी करेल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुख हे एक भ्रम आहे. तुम्ही जितके त्याच्या मागे पळाल, तितके दुःख पदरात पडेल. सुख तुमच्या आत आहे. तुमच्या मनात. ते तिथेच शोधा. तुम्हाला ते एकदाचे सापडले म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी सुखी झालात असेही नव्हे. त्याला तुम्ही चिमटीत पकडून ठेवू शकत नाही. ते निसटल्यावर तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा शोधत राहावे लागेल. पण त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.
(१२-१३ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले सापडले.)
Nice
बरोबर आहे.एखाद्या व्यक्तीविषयी किंवा घटनेविषयी आपल्या मनातील गैरसमज दूर झाला तर आपल्याला सुख मिळू शकेल.
अतिशय सुंदर सर..
खरंच आहे..
सुख आपल्याच जवळ असते आणि आपण ते दुसरीकडे शोधत असतो…