बहुजन समाजाची सद्यस्थिती आणि ती सुधारण्याचे काही उपाय

         (१९/०२/२०१४ रोजी ‘शिवजयंती’निमित्त मी छत्रपती शिवाजी शासकीय व निमशासकीय कर्मचारी पतसंस्था, जव्हार, जि. पालघर आयोजित कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानाची पूर्वतयारी करताना खालीलप्रमाणे लिहून ठेवले होते.)

          भारतात कोणत्याही कालखंडात राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या तीनही सत्ता मूठभर लोकांच्या  हातात राहिल्या आहेत. हा विशिष्ट वर्ग वगळता इतर जे वर्ग किंवा जो समाज यापासून वंचित राहिला व बऱ्याच अंशी आजदेखील आहे तो बहुजन वर्ग, असे मला वाटते. या बहुजन वर्गात हिंदू, बौद्ध, मुस्लिम इ. या सर्व धर्मातील लोकं येतात. या बहुजन समाजाच्या सद्यस्थितीविषयी मला विचार मांडण्यास संयोजकांनी सांगितले होते. थोडे स्वातंत्र्य  घेऊन ती सुधारण्याचे काही उपायही मी सांगणार आहे किंवा विवेचनाच्या  ओघात ते आपोआपच येणार  आहेत.
          विवेचनाच्या सुरुवातीला एक गोष्ट मला आवर्जून सांगाविशी वाटते. अलीकडच्या काळात भारतीय समाजामध्ये तीन प्रकारच्या परंपरा असल्याचे मला दिसून येते. 

           (१) भारतीय स्वातंत्र्याची परंपरा, Read More

गांधींजी आणि त्यांचे टीकाकार- पुस्तक

‘गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ (साधना प्रकाशन) हे पुस्तक वाचले. सुरेश द्वादशीवार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत
सदर पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, जीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर व इतर तत्कालीन नेत्यांचे जीवन, कार्य, स्वभाव, सामर्थ्य, मर्यादा व गांधीजींशी त्यांच्या असलेल्या संबंधांवर लेखकाने

प्रकाश टाकलेला आहे. अनेक ग्रंथ, पत्रव्यवहार, डायऱ्या यांचा अभ्यास करून, आवश्यक तेथे त्यातील संदर्भ दिलेले आहेत. या पुस्तकाच्या वाचनाने गांधींजीच्या संदर्भातील अनेक गैरसमज दूर होतील आणि ज्या महापुरुषाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व देशातील सामान्य माणसाच्या उद्धारासाठी खर्ची घातले. भारतातील विविध जाती-धर्मांमध्ये शांतता, सौहार्द, बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी हौतात्म्य पत्करले. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लोकलढा जगाच्या इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या साम्राज्याविरूद्ध पुकारला व तो यशस्वी करून दाखविला, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल.

Read More

महापुरुषांचे प्राक्तन!

गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या हयातीत प्रेतयात्रा काढली होती, म. फुलेंना मारण्यासाठी रामोशी धाडले होते, तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवली होती, नंतर त्यांना सदेह वैकुंठीही पाठवले, म. गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्या हत्याच झाल्यात. आंबेडकरांचा कित्येक वेळेस अपमान झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. (अशी असंख्य उदाहरणे देता येतील). किती मन दुखवले असेल या महापुरुषांनी त्या काळातील लोकांचे! त्याशिवाय बिच्चाऱ्या लोकांनी असे केले असेल का?

Read More

सुख

आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर दुसरा कुणीतरी आपल्याला कायमचा सुखी करेल, ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सुख हे एक भ्रम आहे. तुम्ही जितके त्याच्या मागे पळाल, तितके दुःख पदरात पडेल. सुख तुमच्या आत आहे. तुमच्या मनात. ते तिथेच शोधा. तुम्हाला ते एकदाचे सापडले म्हणजे तुम्ही कायमस्वरूपी सुखी झालात असेही नव्हे. त्याला तुम्ही चिमटीत पकडून ठेवू शकत नाही. ते निसटल्यावर तुम्हाला ते पुन्हा-पुन्हा शोधत राहावे लागेल. पण त्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

(१२-१३ वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले सापडले.)

इंडियातल्या भारतीयाचे विचार

इंडियातल्या भारतीयाचे विचार

       (सदर लेख १२-१३ वर्षांपूर्वी मी विद्यार्थीदशेत असताना लिहिलेला असून जसाच्या तसा टाईप करून टाकला आहे. लेख वाचताना स्वतः ला अपवाद समजून वाचावे व तसे वाटत नसल्यास आत्मपरीक्षण करावे. पण वाईट वाटून घेऊ नये.)

                 भारत सध्या तरुणांचा देश मानला जात आहे. या देशात सर्वात जास्त तरुण आहेत. पण या तरुणांच्या हाताला काम कुठे आहे? यावर तथाकथित यशस्वी, उच्चवर्गीय, श्रीमंत वर्ग असं म्हणतो की, ज्याने -त्याने मेहनत करून स्वतःचे काम स्वतः मिळवायला पाहिजे, असं म्हणणाऱ्यांना जोड्याने हाणावसं  वाटतं. कारण हे स्वतःच्या श्रीमंतीत, प्रतिष्ठेत मग्रूर आहेत. यांना फक्त मुकेश, अनिल अंबानी बंधू, सचिन तेंडुलकर, काही फिल्मस्टार यांच्या संपत्तीचे हिशेब (तेही कायदेशीर. त्यांची बेकायदेशीर संपत्ती स्वतः त्या व्यक्तींनाही माहिती नसेल) माहिती आहेत. पण या देशात किती टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे? किती टक्के लोक निरक्षर अज्ञानी आहेत?, दर दिवसात किती शेतकरी आत्महत्या करत आहेत?, किती बालके कुपोषणामुळे मरत आहेत?, या देशातल्या प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळांचा दर्जा कसा आहे? दारिद्र्यामुळे हाताला काम न मिळाल्यामुळे किती लोकांची कुचंबणा होत आहे? या प्रश्नांची उत्तरे या  महाभागांकडे आहेत का? मुंबईत बेस्टने किंवा लोकल ट्रेनने जाताना झोपडपट्ट्या, Read More

अभ्यास कसा करावा? (भाग-१)

        अभ्यास कसा करावा (भाग-१)

     मित्रांनो, एखाद्या विषयावर जर आपल्याला प्रभुत्व मिळवायचे असेल तर आपल्याला त्या विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक  असते. प्रत्येक विषयात असंख्य मूर्त, अमूर्त अशा वस्तू, गोष्टी असतात. त्यांचे काहीएक स्वरूप, व्याप्ती व विस्तार असतो. त्याचे काटेकोरपणे आकलन करून घेतले, दोन वस्तू, गोष्टी यातील साम्य-भेद, सीमारेषा व्यवस्थित समजून घेतल्या तर आपली त्या विषयावर पकड निर्माण  होते.

           या असंख्य  संकल्पना  स्पष्ट  करून  घेण्यासाठी, त्यांचे नियमित वाचन होणे, त्या नियमितपणे  नजरेखालून जाणे, त्यावर  विचार, चर्चा, चिंतन, मनन होणे गरजेचे असते. त्यासाठी त्या जर एकाच  संदर्भ  पुस्तकात  मिळत असतील, तर अशी  पुस्तके संग्रही ठेवून त्यांचे  अध्ययन  करायला हवे. मात्र एखाद्या विषयात असे  संदर्भग्रंथ उपलब्ध  नसतील तर आपण स्वतः एक मोठी २०० पेजेस वही घेऊन त्या वहीत सुवाच्च अक्षरांत त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन करून त्यात जिथे-जिथे संज्ञा, संकल्पना स्पष्ट केलेल्या आढळतील. त्या या वहीवर लिहून घ्यायला हव्यात.

      फायदे- Read More