मित्रांनो, आपले शिक्षण संपल्यानंतर आपण आपल्या उद्योग-व्यवसायाला सुरुवात करत असतो. आपल्यापैकी काही लगेच तर काही अनेक वर्ष संघर्ष करून का असेना पण नोकरी मिळवतात व इमाने-इतबारे (!) आपली नोकरी करत राहतात. आपापले काम करत असताना आपल्या सहकाऱ्यांकडून, मित्रांकडून गाव, शहर व परिसरातील लोकांकडून अनेक गोष्टी आपण कळत-नकळतपणे शिकत असतो. अनेक खाजगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही कार्यशाळा, चर्चासत्रे, गट संमेलने, सभा, परिषदा या अनिवार्य केलेल्या असतात. अनिवार्य असल्यामुळे नाईलाजाने आपण त्या करून घेत असतो. आयोजकही कामकाजाचा भाग म्हणून सोपस्कार पार पाडत असतात. वैयक्तिक व्यवसाय, उद्योगधंदे करणाऱ्यांना तर आपल्या इथे अशा कार्यशाळा व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतेच असे नाही. आपणही पुढे-पुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत जातो. जे रूटीन आहे ते चालू ठेवतो.
शिक्षण घेत असतानाही अनेक विद्यार्थी अशा कार्यशाळा अथवा शिबिरांमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांच्या आयोजनामध्ये Read More