(मी माझ्या लग्नानंतर आतापर्यंत जव्हार, जळगाव व नाशिकला मिळून ९ भाड्याच्या घरांमध्ये राहिलो. त्यापैकी जव्हार व नाशिकला मी हा नमुना वापरला. जो मला माझ्या एका ज्येष्ठ सहकार्यांकडून मिळालेला होता. सरकारी करारनाम्यांमध्ये प्रमाण लेखनाच्या किती चुका असतात, हे आपणास ठाऊक आहे. यात मी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. हा नमुना सर्वांसाठी इथे देत आहे.)
लिव्ह अँड लायसेन्स करारनामा
(अकरा महिन्याच्या तत्वावर)
लिव्ह ऍन्ड लायसेन्स करारनामा आज दि………………… रोजी, ………………… या दिवशी नाशिक मुक्कामी लिहून देतो की,
श्री. घर मालकाचे नाव,
वय वर्षे ………….., धंदा-…………., लिहून घेणार
भाड्याने द्यायच्या घराचा पत्ता (लायसेन्सॉर)
…………………………………………….
……………………………………………
यांसी
श्री. भाडेकरुचे नाव,
उ. व. 34, धंदा – नोकरी, लिहून देणार
भाडेकरुचा पत्ता (लायसेन्सी)
……………………………………………..
…………………………………………….
कारणे लिव्ह अँड लायसेन्स करारनामा लिहून देतो ऐसा जे की:
1) मिळकतीचे वर्णन :
……………………………………………………………………………………………….... सदर मिळकतीमधील लाईट व नळ कनेक्शनसह.
2) वर कलम 1 मध्ये वर्णन केलेली मिळकत ही तुमच्या नावे व मालकीची असून ती तुम्ही मला 11 महिन्यांसाठी राहण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स करारनाम्याने द्यावी, अशी मी तुम्हास विनंती केल्याने व माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मला सदर मिळकत खालील अटी व शर्तीवर देत आहात.
अटी व शर्ती: