आज माझे आजोबा (आईचे वडील) आम्हाला सोडून गेले. अनंतात विलीन झाले. ९० वर्षांचे होते. त्यांना सर्वजण ‘जिभाऊ’ म्हणायचे. ते महानुभाव संप्रदायाचे अनुयायी होते. त्यांच्यासोबत गोष्टींचा खूप मोठा खजिना गेला. एकच गोष्टीचा मी व्हिडीओ बनवून ठेवू शकलो होतो.
१५-१६ वर्षांपूर्वी एकदा मी व माझे आजोबा सुरतहून अमळनेरला रात्रीच्या रेल्वेने येत होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही दरवाज्याच्या बाजूला उठबस करत रात्रभर प्रवास केला. झोपणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांनी रात्रभर गोष्टी सांगून लोकांचे Read More