इंडियातल्या भारतीयाचे विचार
(सदर लेख १२-१३ वर्षांपूर्वी मी विद्यार्थीदशेत असताना लिहिलेला असून जसाच्या तसा टाईप करून टाकला आहे. लेख वाचताना स्वतः ला अपवाद समजून वाचावे व तसे वाटत नसल्यास आत्मपरीक्षण करावे. पण वाईट वाटून घेऊ नये.)
भारत सध्या तरुणांचा देश मानला जात आहे. या देशात सर्वात जास्त तरुण आहेत. पण या तरुणांच्या हाताला काम कुठे आहे? यावर तथाकथित यशस्वी, उच्चवर्गीय, श्रीमंत वर्ग असं म्हणतो की, ज्याने -त्याने मेहनत करून स्वतःचे काम स्वतः मिळवायला पाहिजे, असं म्हणणाऱ्यांना जोड्याने हाणावसं वाटतं. कारण हे स्वतःच्या श्रीमंतीत, प्रतिष्ठेत मग्रूर आहेत. यांना फक्त मुकेश, अनिल अंबानी बंधू, सचिन तेंडुलकर, काही फिल्मस्टार यांच्या संपत्तीचे हिशेब (तेही कायदेशीर. त्यांची बेकायदेशीर संपत्ती स्वतः त्या व्यक्तींनाही माहिती नसेल) माहिती आहेत. पण या देशात किती टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आहे? किती टक्के लोक निरक्षर अज्ञानी आहेत?, दर दिवसात किती शेतकरी आत्महत्या करत आहेत?, किती बालके कुपोषणामुळे मरत आहेत?, या देशातल्या प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळांचा दर्जा कसा आहे? दारिद्र्यामुळे हाताला काम न मिळाल्यामुळे किती लोकांची कुचंबणा होत आहे? या प्रश्नांची उत्तरे या महाभागांकडे आहेत का? मुंबईत बेस्टने किंवा लोकल ट्रेनने जाताना झोपडपट्ट्या,
तेथली दुर्गंधी , त्या दुर्गंधीत सडत चाललेली माणसे, त्यांचे जीवन याविषयी आमचे हे वाचाशूर थोडा तरी विचार करतात का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल.
या देशातला गरिबाचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा दारिद्र्यातून शिकून-सवरून एखादा वर आलेला कुणी शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, क्लास १, २ व इतर अधिकारी हे सर्वच खरं म्हणायला गेले तर, त्यांच्या आईबापांचे, त्यांच्या समाजाचे, त्यांच्या गरीब बांधवांचे शत्रू आहेत. अगदी वरच्यांना दोष नंतर दिला जाईल. परंतु आधी हेच खरे दोषी आहेत. कारण हे शिकले, चांगले पैसे कमवू लागले. पण नंतर स्वतःच्या संसारात रममाण झाले. सामाजिक बांधिलकी व इतर गोष्टींच्या नुसत्या गप्पा मारू लागले. यांनी प्रत्यक्षात समाजाकरीता किमान एकाकरताही काहीच केलं नाही. कोणी प्राध्यापक झाल्यानंतर एम.फिल., पीएच.डी.कडे वळले. ते झाल्यानंतर वरच्या पदासाठी राजकारण्यांचे, संस्थाचालकांचे तळवे चाटू लागले. (संस्थाचालक पदे भरण्यासाठी ५-१० लाख रु. डोनेशन घेत आहेत.) तर डॉक्टर वगैरे लोकांनी मोठे मोठे दवाखाने टाकले व भरमसाठ पैसे कमवू लागले. क्लास १, २ व इतर अधिकारी याच गरीब लोकांकडून लाच मागून त्यांचे शोषण करू लागले व ठरलेले हप्ते वरच्या लोकांकडे पाठवू लागले.
या देशात काही जण १ लाख कोटी रुपयाचे मालक बनत आहेत. काहीजण ४०-४० हजार कोटींचा एकच प्रोजेक्ट उभा करत आहेत. तर काही जण एक-एक घास अन्नासाठी तडफडत आहेत. या *****ना बाजूच्या माणसांशी बोलायला वेळ नाही. ते मोबाईल वगैरे मध्ये बोटं घालत आहेत. शेअर बाजार १५,००० चा आकडा पार करत आहे. विदेशी चलन वाढत आहे. मग इथले शेतकरी आत्महत्या का करत आहेत?
काही नाही! या स्वतःतच रमलेल्या लोकांना ठोकायला पाहिजे. यांचा पैसा या देशासाठी काहीच कामाचा नाही. या मूठभर हरामखोरांच्या जीवावर भारताला महासत्ता बनविणाऱ्या मूर्खांना ते किती भयानक समस्यांना जन्म देत आहेत याची कदाचित कल्पना नाही. या सर्वांना एका मोठ्या जहाजात बसवून ते जहाज बर्म्युडा ट्रँगलमध्ये बुडवून टाकायला पाहिजे.
हे सर्व यासाठी की, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला दोन वेळचे पोटभर अन्न मिळायला पाहिजे. त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे त्यांना पुरेसं शिक्षण व प्रशिक्षण मिळायला पाहिजे. त्यांना सुरक्षित व चांगल्या वातावरणात निवारा मिळायला पाहिजे. अंग झाकायला पुरेसे वस्त्र मिळायला पाहिजे. समाजात मान-सन्मान मिळायला पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याची संधी मिळायला पाहिजे.
माझ्या पुढील प्रश्नाचे उत्तर कधीतरी होकारार्थी मिळेल का?
१) या देशातील प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम मिळेल का?
२) या देशातील प्रत्येक माणसाला दोन वेळचं पोटभर अन्न, योग्य-सुरक्षित-निरोगी वातावरणात निवारा, अंग झाकायला पुरेसा कपडा मिळेल का?
३)…
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113
(तुम्हाला माझे लेखन आवडत असेल तर खाली शेअरचे जे विविध पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक पर्यायांचा वापर करून आपले मित्र, नातेवाईक, विद्यार्थी यांना पाठवा. धन्यवाद!🙏🙏)
वास्तविक स्थिती मांडलात सर