https://m.facebook.com/story.php?story_fbid=1753475321512027&id=100005487283430 या लिंकमधील पोस्टवरील माझी प्रतिक्रिया खाली दिली आहे.
कधी कधी माणूस नकळत गुंतत जातो. सावध असले तरी पुढे जात राहतात. पण वेळीच थांबावे. जो विवाहित असेल त्याने समोरच्याला अडकवून ठेवू नये. त्याच्यावर मालकी हक्क गाजवू नये. त्याला खोटी आश्वासने देऊ नयेत. त्याला त्याच्या करियर व लग्नासाठी प्रोत्साहन द्यावे. थोडेफार जे घडले असेल, ते मनात ठेवावे. त्या गोड स्मृती समजून जपून ठेवाव्यात. पण समोरच्याचे आयुष्य बरबाद करू नये. कारण त्यामुळे आपली बायको व मुले यांचेही नुकसान होऊ शकते.
अविवाहित व्यक्तीनेही समोरच्याच्या जबाबदाऱ्या, कुटुंब यांचा विचार करावा. काही गोष्टी दोन्ही बाजूंनी भावनेच्या भरात घडत जातात, हे जरी खरे असले तरी वास्तव समजून घ्यावे.
स्त्री-पुरुषांमधील मैत्री, प्रेम या अतिशय गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत. त्यात ओढ, आकर्षण हे असतेच. पण आपण वयाने बऱ्यापैकी प्रौढ असतो. तेव्हा योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात असते. वेळीच एकमेकांना थांबवून दोघे मिळून योग्य निर्णय घ्यायला एकमेकांना मदत करायला हवी. समोरच्याच्या भावनांचा गैरफायदा घेता कामा नये.