गंगाधर बाळकृष्ण सरदार (०२ ऑक्टो. १९०८ – ०१ डिसें.१९८८)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व विचारवंत म्हणून सर्वपरिचित. शिक्षण- एम.ए., पीएच.डी. (मराठी). जन्म व प्राथमिक शिक्षण जव्हार, जि. पालघर. स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग व तुरुंगवास. एसएनडीटी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्य. १९८० सालच्या बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
गं. बा. सरदार यांनी लिहिलेले ग्रंथ :
- अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
- जोतीराव फुले (१९४४)
- संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)
- महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९४१)
- गांधी आणि आंबेडकर (१९८७)
- रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७५)
- आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५)
- प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८)
- महात्मा फुले – व्यक्तित्व आणि विचार (१९७८)
- नव्या युगाची स्पंदने (१९८२)
- धर्म आणि समाजपरिवर्तन (१९८२)
- नव्या ऊर्मि, नवी क्षितिजे (१९८७)
- परंपरा आणि परिवर्तन (१९८८)
- The Saint-Poets of Maharashtra: Their Impact on Society (in English) (1969)
संपादित ग्रंथ –
- तुकाराम दर्शन (१९६८)
- ज्ञानेश्वरांची जीवननिष्ठा (१९७१)
- रामदासदर्शन (१९७२)
- एकनाथ दर्शन (१९७८)
- महाराष्ट्र जीवन – खंड १ व २ (१९६०)
- संक्रमणकालाचे आव्हान (१९६६)
संकलक- डॉ. राहुल पाटील