●बऱ्याचशा श्रद्धा जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात.
●सत्यनारायण पूजा/ विधी नव्हता, तोपर्यंत कुणीही
घालत नव्हते. अमळनेरमध्ये २५ वर्षांपूर्वी मंगळग्रह मंदिर नव्हते. तोपर्यंत कुणी तिकडे तडफडत नव्हते.
● सर्वसामान्यांच्या मनातील श्रद्धा ह्या ऐतखाऊ लोकांच्या उत्पन्नाचे साधन आहेत. त्यांची रोजगार हमी योजना आहे. म्हणून ते अशी नवनवीन ठिकाणे, विधी जन्माला घालत असतात व बहुजन समाजातील लोकं कोणतीही चिकित्सा न करता श्रद्धेच्या नावाखाली अशा ठिकाणांना भेटी देत असतात, निरर्थक विधी पैसे देऊन करत असतात व अशा ऐतखाऊ लोकांना पोसत असतात.
● बऱ्याचशा श्रद्धा या तर काहीतरी वाईट, अनिष्ट घडण्याची भीती दाखवून व नोकरी मिळणे, मुला-मुलींची लग्न जमणे, घरात सुख संपत्ती समृद्धी येते असे आमिष दाखवूनच निर्माण केल्या जात असतात.
● असा सदा सर्वकाळ श्रद्धेमध्ये गुंतून राहणारा समाज निर्माण झाला की मग यांनी निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेची चिकित्सा कुणी करीत नाही. कुणी केली तरी लोकं त्यावर विश्वास ठेवत नाहीत.
● लोक अशा हजार श्रद्धांमध्ये गुंतून राहिले की विविध क्षेत्रांमध्ये यांच्यापुढे चांगले तगडे स्पर्धक उरत नाहीत. मग अनेक चांगल्या क्षेत्रांमध्ये यांची सरशी होते आणि लोकांना असे वाटते की कॅलिबर फक्त याच लोकांमध्ये असते.
● खरंच अशा ‘श्रद्धा निर्माण करणाऱ्या लोकांमध्येच’ caliber असते!
- © राहुल पाटील