🌝कोजागिरीचा चंद्रमा🌝
कोजागिरीचा चंद्रमा
मला वेगळाच भासला
तोही एकटा, मीही एकटा
डोळे भरून मी त्याला पाहताना
तो मला खुणावताना दिसला.
कोजागिरीचा चंद्रमा…–१–
डोळ्यात आसवे अन्
ओठावर स्मित होते
माझेही दु:ख काही
त्याहून वेगळे नव्हते
मला त्याचा, त्याचा मला
असा सहवास लाभला.
कोजागिरीचा चंद्रमा….–२–
मी त्याची, त्याने माझी
विचारपूस केली
रात्रभर मनसोक्त गप्पा केल्या
आम्ही दोघांनी
मला त्याचा, त्याचा मला
वेगळाच आधार वाटला.
कोजागिरीचा चंद्रमा…–३–
तोही विसरला, मीही विसरलो
सोबत आपली काही क्षणांची
रात्र संपताच जावं लागेल
हातात आपल्या नाही नियती
दीर्घविरहानंतर आपण पुन्हा भेटू
वचन मज तो देऊन गेला.
कोजागिरीचा चंद्रमा…–४–
मिलन जरी आता अमुचे
दररोज नाही होणार
वर्षातनं एकदा का होईना
एकमेकांची वाट पाहणार
जन्मोजन्मांतरीचा प्रीतीचा धागा
या जन्मीही जुळून गेला
कोजागिरीच्या चंद्रमेचा आता मी
तो माझा बनून गेला.
कोजागिरीचा चंद्रमा…–५–
(१४/१०/२००८- कोजागिरी पौर्णिमा)
© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113