प्रत्येक गावात सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, प्रयोगशाळा, क्रीडांगण, उद्यान, आरोग्य केंद्र, एक मोठे सार्वजनिक सभागृह, कृषी मार्गदर्शन
केंद्र इ. गोष्टी असायलाच हव्यात. त्या सुरळीतपणे चालविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची नेमणूक केली जावी. गावकऱ्यांनी या गोष्टींच्या उभारणीवर पैसा खर्च करायला हवा. मग बघा ५-१० वर्षात त्या गावात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोकं कसे तयार होतात ते.
तसेच कोरोनासारख्या महामारीच्या प्रसंगी ह्याच संस्था त्यावर मात करण्यासाठी कामात येतील. कारण त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक बौद्धिकदृष्ट्या सक्षम लोकं तयार होतील. जे समस्यांचे स्वरूप लवकर समजून घेतील. किंबहुना यापैकीच काहीजण त्यावर उपाययोजनाही शोधून काढू शकतील.