संविधान हा माझ्या
आत्म्याचा हुंकार आहे
संविधानाचा सरनामा
माझ्या जगण्याचा गाभा आहे.
माझ्यात एक भारत आहे
मीही एक भारत आहे
कोण कसा आहे
मला काय करायचे
माझ्यातल्या भारताला
मला आहे जपायचे.
मी हिंस्त्र, भारत हिंस्त्र
मी भ्रष्,ट भारत भ्रष्ट
मनातले हे तण म्हणून
आहे उपटून टाकायचे
माझ्यातल्या भारताला
समृद्ध, संपन्न आहे करायचे.
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113