खूप-खूप अभ्यास कर,
मोठा हो. आत्मविश्वासाने
स्वाभिमानी जीवनाची
पायाभरणी कर.
कठोर ज्ञानसाधना कर,
ज्ञानवंत, बुद्धिवंत हो!
संकटांतून तावून-सुलाखून निघशीलतरच लोखंडाचा पोलाद बनशील.
येईल अपयश कधी
सामोरा जा धीराने,
सुख-दुःखांकडे समभावाने बघ.
दोन दिवसांचे आयुष्यही
संस्मरणीय बनून जाईल
प्रत्येक क्षणाला पुरेपूर जग.
मूल्ये विसरू नको, अन्यथा
विद्वान बनूनही राक्षस ठरशील
रावणासारखा…
सन्मार्गावर चालशील, तर
वनवास भोगूनही देव ठरशील
रामासारखा…
घाम, रक्त, अश्रू यांना अमृतासमान मान.
आयुष्य अर्थपूर्ण बनवतेय ही त्रिपुटी!
क्षितिजाकडे पाहून ते गाठताना
पायाखाली कुणी चिरडलं तर जात नाही ना?
काळजी घे…
(०२/०९/२००९)
© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113