कालचक्र

कालचक्र चालत आहे

मी थांबलो तरी

कालचक्र फिरत राहणार

उद्या मी संपलो तरी

कालचक्रा न तमा

तुझी अनˎ माझी

सर्व संपल्यावरही उरणार

कालचक्राची गती

हातातले एक फूल जे

हळूहळू सुकत जाणार

निर्माल्यासम पाण्यात, आगीत

वा मातीत जाणार

या फुलाला का होती

मग भास अनंत ?

या फुलाला का वाटे

मी सर्वश्रेष्ठ ?

रे फुला जाणून घे

जीवनाचे सत्य

दोन दिसांचा ताजवा

आणि जीवनाचा अंत !

(०९/०३/२०१६)

© copyright

डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

माझे youtube वरील व्हिडीओ पाहण्यासाठी व माझे विविध विषयांवरील विचार ऐकण्यासाठी माझ्या youtube channel ला भेट द्या व माझ्या channel ला Subscribe करा. धन्यवाद!

माझ्या youtube channel ची लिंक- https://www.youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

4 thoughts to “कालचक्र”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *