खालील व्हाट्सअप चर्चा पूर्ण वाचा.
[25/06, 1:06 PM] +91 93701 57488: सर नेट पास झाल्यावर एकनाथ सारखी आम्हालाही डोनेशन द्यावे लागेल का?
[25/06, 1:07 PM] डॉ. राहुल पाटील: आधी फोकस नेट सेटवर करा. ते पास झाल्यावर बोलू. अनेक संधी असतात.
[25/06, 1:13 PM] डॉ. राहुल पाटील: एकनाथने अनेक शक्यतांचा शोध घ्यायला हवा होता. नंतर तो तसे काही शोधताना दिसत नाही.
[25/06, 1:25 PM] डॉ. राहुल पाटील: मलाही डोनेशन लागलेले नाही.
[25/06, 1:55 PM] शैलेश औटी सर वसई: मी डिसेंबर १९९७ मध्ये नेट आणि सेट परीक्षा पास झालो.
कोणतीही ओळख/वशीला अथवा देणगी वगैरे न देता माझी २०११ मध्ये नोकरीसाठी निवड झाली
अर्थात मला १९९७ ते २०११ असा प्रदीर्घ काळ (साडेतेरा वर्षे) पूर्णवेळ आणि स्थायी (पर्मनन्ट) नोकरीसाठी वाट पाहावी लागली.
दरम्यानच्या काळात दहा वर्षे मी अत्यंत कमी मोबदल्यात एका महाविद्यालयात (पूर्णवेळ) शिकवत होतो. दोन वर्षे आणखी दोन महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एक वर्ष अस्थायी स्वरूपाचे काम केले. या सर्व काळात उपजीविकेसाठी आकाशवाणी-दूरदर्शन या सरकारी माध्यमांच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यामधून पत्रकारिता, वृत्तांकन, वृत्तनिवेदन, अनुवाद अमराठी भाषकांसाठीच्या मराठी प्रमाणपत्र वर्गासाठी अध्यापन, पुस्तकांची परीक्षणे लिहिणे… तसेच काही महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (CHB) अध्यापन अशा गोष्टी करत होतो.
मात्र भाषेचे अध्ययन-अध्यापन, भाषेचे विविध क्षेत्रात उपयोजन अशा क्षेत्राशी या ना त्या प्रकारे निगडित होतो. या कालखंडात अनेक ठिकाणी नोकरीसाठी मुलाखती देऊनही निवड होत नव्हती. काही वाईट अनुभवही आले.
मात्र मी आज माझ्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि कोणतेही गैरप्रकार न होता मुलाखतीमधून योग्य उमेदवाराची निवड होते हा माझाही अनुभव आहे.
अभ्यास आणि मेहनत करण्याची तयारी तसेच सरळ मार्गाने नोकरी मिळवण्यासाठी वाट पाहत असताना मनस्थिती चांगली ठेवणे हे एक आव्हान आहेच!
[25/06, 2:17 PM] डॉ. राहुल पाटील: धन्यवाद सर! वस्तुस्थितीची तसेच विविध संधी, क्षेत्रे इ.ची माहिती करून दिल्याबद्दल.🙏🙏
[25/06, 2:26 PM] डॉ. राहुल पाटील: मी २००७ मध्ये एम.ए. व नेट तसेच २००८ मध्ये नेट-जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण झालो. मला नोकरी नोव्हे. २०११ मध्ये मिळाली. दरम्यानच्या काळात मी एक वर्ष जळगाव येथे एका महाविद्यालयामध्ये विनाअनुदानित तत्त्वावर काम केले. तसेच त्यानंतर मी दोन वर्ष JRF व चार महिने SRF घेतली. फेलोशिपमध्ये मला जवळपास सहा लाख रु. मिळाले. २००९ ते २०११ या काळात. जव्हार येथे कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यावर मी ही फेलोशिप सोडली.
सांगायचे तात्पर्य, तुम्ही आता फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही नेट/सेटच करा, असे आम्ही म्हणणार नाहीत. पण अनेक कौशल्ये आत्मसात करा व विषयाचे भरपूर ज्ञान मिळवा. व्यक्तिमत्त्वाचा विकास करून त्या माध्यमातून स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवा. आपोआप तुम्हाला मार्ग व संधी मिळत राहतील.
[25/06, 2:29 PM] +91 93701 57488: होय सर
[25/06, 2:42 PM] डॉ. राहुल पाटील: बदलत्या काळाच्या आव्हानांना शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्ये यांच्या मदतीनेच सामोरे जावे लागेल. शिकलोच नाही तर आजूबाजूला काय चाललंय, तेही समजणार नाही व म्हणून अंधारात आयुष्याची वाटचाल करावी लागणार. ज्ञान व कौशल्यांविना फक्त अंगमेहनत करून कमी मोबदल्यात जगावे लागणार.
विद्यार्थीदशेत अभ्यास व उदरनिर्वाहासाठी थोडं काहीतरी काम
शिक्षण संपल्यावर उदरनिर्वाहासाठी काहीतरी काम व अभ्यास
असे आयुष्याचे नियोजन करा. मध्ये मध्ये कमी कालावधीचे काही कोर्स करून घ्या.
असे केले की मग द्वंद्व, नैराश्य, चिंता, असुरक्षितता फार येणार नाही.
विद्यार्थीदशेत मात्र झपाटून भरपूर शिका. कौशल्ये आत्मसात करा. आयुष्यभर कामात येईल.
[25/06, 2:46 PM] शैलेश औटी सर वसई: एक ध्येय्य निश्चित करून त्यासाठी झपाटल्याप्रमाणे प्रयत्न करा मात्र त्याचबरोबर इतर कौशल्ये आत्मसात केलेली असतील तर तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करत असताना दरम्यानच्या काळात उपजीविकेचे साधन म्हणून काही पर्याय निश्चितपणे उपलब्ध असतील.👍
[25/06, 2:50 PM] शैलेश औटी सर वसई: आपण ज्या क्षेत्रात शिक्षण/प्रशिक्षण घेतो आहोत त्या क्षेत्राशी संबंधित इतर अनेक पूरक अशी उपक्षेत्रे असतात त्यामधील कौशल्ये आत्मसात केल्यास त्याचा तुमच्या व्यवसायात तर उपयोग होतोच मात्र त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायात स्थिर होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागली तरी तोवर तुम्हाला उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणूनदेखील अशा कौशल्यांचा उपयोग होतो.