भगवद्गीता : थोडं चिंतन (एका पोस्टवरील प्रतिक्रिया…)

          गीता ही मूळ महाभारताचा भाग नाहीये. असे अभ्यासक मानतात. ती खूप नंतर लिहून महाभारतात युद्धाच्या प्रसंगाच्या आधी जोडली गेलेली आहे. त्यामुळे तिच्यातील तत्त्वज्ञान हे महाभारताचा जो कोणता काळ असेल, त्या काळाचे तत्त्वज्ञान नसावे. गीतेत कर्मयोग, सांख्य, ज्ञानयोग असे ज्याला जे हवे आहे असे

‘सर्वसमावेशक’, सर्वांना खुश करणारे पॉप्युलर तत्त्वज्ञान मांडले गेले आहे. बुद्ध-महावीर यांचा जनमाणसावरील प्रचंड प्रभाव, समतेचे तत्त्वज्ञान यांच्या प्रभावातून लोकांना बाहेर काढून पुन्हा चातुर्वर्ण्यव्यवस्था बळकट करण्यासाठीच गीता लिहिली जाऊन तिला प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली दिसते.

          मध्ययुगात गीतेवर भाष्य करणाऱ्यांनी व्यवहारातील जन्माधारित जातिव्यवस्था, वर्णव्यवस्था यांना धक्का लावल्याचे उदाहरण दिसत नाही. आधुनिक काळात ‘गीतारहस्य’ लिहिणारे लो. टिळकसुद्धा जाती व वर्ण जन्मधारीतच मानीत होते. नाहीतर त्यांनी ‘कुणब्यांना, तेल्यांना कायदेमंडळात येऊन…..’ असे म्हटले नसते. मीही गीता अनेकदा समजून उमजून वाचलेली आहे. त्या विशिष्ट वयात दुसरे काहीच वाचलेले नसल्याने झपाटूनही गेलो होतो. पण गीतेवर आधारित समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा प्रयोग भारतात झाल्याचे दिसत नाही, हे नंतर अभ्यासांती लक्षात आले.

         असो. ज्या काळात गीता लिहिली गेली. त्या काळात तत्कालीन भारतात आजच्यासारखे कोणतेही संघटित धर्म नसूनही गीता आज एका प्रतिष्ठित धर्माचा एकमेव धर्मग्रंथ असल्याने जास्त न बोललेलेच बरे!

© डॉ. राहुल रजनी

 

मराठी साहित्य, व्याकरण, भाषाविज्ञान, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, नेट, सेट, पेट, MPSC- UPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा विषयांवरील व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून माझ्या YouTube channel ला भेट द्या व आवडल्यास Subscribe करून Bell Icon बटनावर क्लिक करा. जेणेकरून माझे नंतरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. https://youtube.com/channel/UC24zjeOVypVJ4JmO8siwQsw

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *