आज SYBA च्या वर्गात फळ्यावर’ संसद, लोकसभा / राज्यसभा, विधानसभा / विधानपरिषद असे शब्द लिहिले. भारतीय संसदेत काय येतं, असे विचारले. ३०-३५ मुलांपैकी कुणालाच सांगता आलं नाही. त्यानंतर तुम्ही ज्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून देतात ते वरीलपैकी कोणत्या सभागृहात जाऊन बसतात , असे विचारले. नाही सांगता आले. नाही सांगता आले.
मागच्या वर्षी NSS मधील प्रवेशासाठी जवळपास ३०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काेणत्याही ५
राजकीय नेत्यांची नावे विचारली. ९५ टक्के मुलांना सांगता आली नाहीत. हेच नवीन मतदार आहेत. राज्यव्यवस्था, लोकशाही, राज्यघटना, राजकीय पक्ष, त्यांचा इतिहास, ध्येयधोरणे, तत्त्वज्ञान, त्यांच्या जनकसंस्था याविषयी कुठलीही माहिती नसलेले मतदार! मग हे काय बघून मतदान करतील. तर एकतर पैसे घेऊन किंवा ‘गर्व से कहो…’ यासारख्या घोषणांना बळी पडून. माझ्या मते, हे सर्व अंध मतदार आहेत. ज्यांना लोक्षाहीव्यवस्थेवद्दल फार काहीही माहित नाही. ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल आहे!’ बघून प्रचंड अस्वस्थ वाटतं.
(०७/०७/२०१८)