माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. उदा. धर्म, जात, पंथ, संप्रदाय, पक्ष, लिंग, वय, वर्ण, रंग, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, देश, प्रांत, वंश, भाषा, वेशभूषा, संस्कृती, प्रथा-परंपरा, दैवते, विचारधारा, प्रस्थापित-विस्थापित इ. इ.
याउलट प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, संवेदनशीलता, अंत:करणातील ओलावा या गोष्टी वरील कृत्रिम व मानवनिर्मित (तर काही निसर्गनिर्मित) भेदांवर मात करून माणसांना एकमेकांच्या जवळ आणतात. या गुणांमुळे माणसाचे अस्तित्व व माणूसपण टिकून आहे.
तेव्हा चला, आपल्या मनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, संवेदनशीलता, अंत:करणातील ओलावा इ. गुणांची वृद्धी करूयात. वरील भेद विसरून, बाजूला ठेवून माणूस म्हणून जगूयात.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, या लेखात गेल्या २०० वर्षांमध्ये भारतीय समाजात कोणकोणते बदल घडून आले, त्याच्या आधी काय परिस्थिती होती व आज समाजाची मानसिकता कशी आहे, याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व समजूतदार नागरिकांनी हे समजून घेणे…
मी पुन्हा पुन्हा धर्मावर टीका करतो असे म्हणणाऱ्यांसाठी - मी धर्माला नव्हे तर धर्माच्या नावाने चाललेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, राजकारण, शोषण, कट्टरता, अज्ञान, गल्लेभरूपणा इ. गोष्टींना कडाडून विरोध करतो. आपण महाराष्ट्रातील संत तुकाराम, सावरकर, प्रबोधनकार, फुले, लोकहितवादी, आगरकर, ताराबाई शिंदे, इ. चे वैचारिक साहित्य वाचले तर माझ्या उद्देशाबद्दल शंका घेणार नाहीत…
२००५ पर्यंत मीही धार्मिक, आध्यात्मिक लोकांच्या प्रभावाखाली होतो. स्वाध्यायात जायचो. व्रती म्हणून काम करायचो. व्रती म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन स्वाध्याय केंद्र चालविणारी व्यक्ती. स्वाध्यायात असताना धार्मिक विषयावरची अनेक पुस्तकं वाचली. नोट्स काढल्या. प्रचार-प्रसाराचे कार्य केले. एकदा ५-६ दिवसांसाठी माउंट अबूला 'ओम शांती' वाल्यांच्या केंद्रात राहूनही आलो होतो. माझ्याकडे तेथील फोटोही…