मला विद्यार्थीदशेत पुस्तकं वाचताना त्यातील महत्त्वाचे परिच्छेद, वाक्ये, संवाद, सुभाषिते, कवितांच्या ओळी इत्यादी लिहून ठेवण्याची सवय होती. अशा कित्येक वह्या माझ्याकडे भरून पडलेल्या आहेत. आजही ते वाचलं तरी त्यातील बरचसं मी कुठे बसून वाचलं (म्हणजे धाब्यावर, शेतात, गावाबाहेरच्या शाळेत, बसस्टँडवर, बसमध्ये, लायब्ररीत की अजून कुठे), मी कोणत्या पोझिशनमध्ये बसलेलो होतो हे सर्व आठवतं. स्वतःचे ते चित्र, image
च डोळ्यासमोर उभी राहते. अविस्मरणीय असा काळ होता तो! पूर्णवेळ विद्यार्थी होतो मी तेव्हा.
विद्यार्थ्यांना माझे आवाहन आहे की, ही सवय तुम्हीही लावून घ्या. लिहिल्यावर त्याखाली किंवा वर किंवा मग समासात दिनांक टाका. खाली पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव, ठिकाण, पुस्तक कुठून, कुणाकडून घेतले होते त्याचे नाव, पुस्तकाची किंमत, पृष्ठ क्रमांक असे लिहून ठेवत जा. यामुळे ते पुस्तक जर तुम्हाला पुन्हा हवे असेल तर ते मिळवायला सोपे जाते. तसेच ते वाक्य (किंवा जे काही असेल ते) कोणत्या व कुणाच्या पुस्तकातील आहे, त्याचा संदर्भ देता येतो. (अर्थात, हे सर्व मी तेव्हा बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवलेले नाही, तुम्ही ते करावे म्हणून सांगत आहे.)
भविष्यात हा संग्रह तुम्हाला खूपच लाभदायक ठरेल. तुम्हाला ते निबंध लिहिताना, भाषण करताना, शिकविताना, दुसऱ्याला सांगायला खूप कामात येईल. तुमची भाषा सुधारेल, शब्दभरणा वाढेल. हळूहळू भाषेवर प्रभुत्व येत जाईल. तुमच्या व्यक्तिमत्वावरही त्याचा चांगला परिणाम होईल.
असेच लिहून ठेवलेले मला जसं शक्य होत जाईल तसं तुमच्यासाठी स्टेट्स किंवा फेसबुकवर त्याचे फोटो काढून मी टाकणार आहे.
माझ्या फेसबुक प्रोफाईलची लिंक- https://www.facebook.com/rahul.b.patil.12
Nice sir
Nice…….
अतिशय सुंदर लेख आहे… आम्हाला याचा नक्कीच लाभ होईल… 🙏