०० शून्य ००

०० शून्य ००

 

असंही जगता येतं

तसंही जगता येतं

तसंही जगता येतं

असंही जगता येतं

सर्व जगून झाल्यावर

बाकी शून्यच उरतं.

 

हसूनही जगता येतं

रडूनही जगता येतं

हसवूनही जगता येतं

रडवूनही जगता येतं

सर्व जगून झाल्यावर

बाकी शून्यच उरतं.

 

जगूनही जगता येतं

मरूनही जगता येतं

जगून मरून झाल्यावर

बाकी शून्यच उरतं.

 

झोपूनही जगता येतं

कष्टुनही जगता येतं

मागूनही जगता येतं

मातुनही जगता येतं

सर्व करून झाल्यावर

बाकी शून्यच उरतं.

 

जीवनसत्य शून्य

गुणूनही शून्य

भागुनही शून्य

मिळवूनही शून्य

काढूनही शून्य.

 

मी एक शून्य 

तू एक शून्य

हा, ही, तो, ती

सर्व सर्व शून्य.

 

शून्याचा ध्यास 

मनी लागला

शुन्यात रमला 

जीव माझा.

 

© copyright

डॉ. राहूल रजनी

patilrahulb14@gmail.com

Mob. No. 962309211

One thought to “०० शून्य ००”

  1. खूप छान ,
    शेवटी सर्व शून्य अन् फक्त शून्यच
    तरी किती ही वणवण जगण्याची
    हार ही शून्य अन् जितही शून्य
    शेवटी प्रत्येक स्पर्धेची बाकीही शून्यच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *