मंदिर डोंगराएवढं उंच असलं काय किंवा गुडघ्याएवढं असलं काय, भक्ती व श्रद्धेत काहीच फरक पडत नाही. तसंच दोन मिनिटे डोळे बंद करून देवाचे नाव घेतले काय किंवा सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत नाव घेत
राहिलात काय, यात गुणात्मक फरक काहीच पडत नाही. त्याचप्रमाणे दोन मिनिटं अंतरावरील प्रार्थनास्थळात जाऊन प्रार्थना केली काय किंवा दोन हजार किमी अंतरावरील प्रार्थनास्थळावर जाऊन केली काय, दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. तुमच्या आयुष्यात वेगळं काहीच घडणार नाही. शेवटी एका शायराची ओळ आठवते- “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यू कर ले, किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाये”
– राहूल पाटील